आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीराला पहिल्यांदा भेटल्यावर अशी होती शाहिदची रिअॅक्शन, पाहा Wedding Album

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नाच्या विधीदरम्यान शाहिद-मीरा - Divya Marathi
लग्नाच्या विधीदरम्यान शाहिद-मीरा
एंटरटेन्मेंट डेस्क: अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतचे लग्न 7 जुलैला पंजाबी पद्धतीने झाले. शाहिदचे लग्न पहिल्यापासूनच चर्चेत होते. यामागील कारण होते त्याची पत्नी. तिला शाहिदने मीडियापासून दूरच ठेवले. मीराची एक झलक पाहण्याची सर्वांना उत्सूकता होती. अनेक विधींनंतर शाहिद आणि मीराने मीडियासमोर पहिला अॅपीयरन्स दिला. यादरम्यान शाहिद कुणाल रावलच्या डिझाइनर ऑफ व्हाइट शेरवानी, तसेच मीरा अनामिका खन्नाच्या बेबी पिंक
लहंग्यात दिसली होती.
जेव्हा मीराला पहिल्यांदा भेटला शाहिद, अशी होती रिअॅक्शन...
शाहिदच्या सांगण्यानुसार, जेव्हा तो दिल्लीत पहिल्यांदा मीराला भेटला तेव्हा त्याची रिअॅक्शन वेगळीच होती. अलीकडेच एका मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला होता. शाहिदच्या सांगण्यानुसार, 'मी मीराला पाहिल्यांदा पाहिले तेव्हा मनात वाटले, की मी याच मुलीसोबत लग्न करू शकतो. परंतु नंतर पुन्हा विचार केला आणि मनातल्या मनात म्हणालो, की तू हा काय विचार करतोय. केवळ 20 वर्षांची आहे ती.'
शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे मीरा...
मीरा शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या लग्नाच्या एक दिवसापूर्वी संगीत, हळदचा फंक्शन आयोजित करण्यात आला होता. तसेच, दुस-या दिवशी गुडगावच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन ठेवले होते. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लग्नाचे रिसेप्शन 12 जुलैला मुंबईच्या लोअर परेल स्थित पॅलेडेयिम हॉटेलमध्ये आयोजित केले होते.
या पार्टीत अमिताभ बच्चन, अनिल कपूर, आलिया भट, सोनम कपूर, कंगना रनोट, जेनेलिया डिसूजा, श्रद्धा कपूर, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, अनुराग कश्यप, प्रिती झिंटा, दीया मिर्झा, सोनू सूद, तुषार कपूरसह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. शाहिद-मीराच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहिद-मीराच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...