आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे होणारेय शाहिद-मीराची मेंदी-संगीत सेरेमनी, रिसेप्शनचा व्हेन्यू झाला लीक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गुडगांव येथील हॉटेल ट्रिडेंट, येथे शाहिद आणि मीराची संगीत आणि मेंदी सेरेमनी होणारेय.)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री शाहिद कपूर आणि दिल्ली गर्ल मीरा राजपूत पुढील महिन्यात लग्नगाठीत अडकणारेय. बातम्यांनुसार, 5 ते 8 जुलै या काळात दिल्लीत हे दोघे विवाहबद्ध होतील. त्यानंतर 12 जुलै रोजी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाहिद-मीराचे मित्र आणि बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. ताज्या बातमीनुसार, शाहिद आणि मीराच्या मेंदीपासून ते रिसेप्शनपर्यंतची व्हेन्यू लिस्ट लीक झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत लग्नाचा मेन इव्हेंट होणार असून इतर सेलिब्रेशनसाठी वेगवेगळी ठिकाणे बुक करण्यात आली आहेत. मेंदी आणि संगीत सेरेमनीसाठी गुडगांव येथील हॉटेल ट्रिडेंड बुक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या फार्महाऊसमध्ये लग्नसोहळा होणारेय, तेथून हे हॉटेल खूप जवळ आहे. शाहिद 2 जुलै रोजी गुडगांव येथे पोहोचणार असून तयारीकडे लक्ष देणारेय.
मुंबईतील हॉटेल पॅलेडियममध्ये होणार रिसेप्शन
शाहिद आणि मीरा दिल्लीत लग्नगाठीत अडकल्यानंतर 12 जुलै रोजी मुंबईत रिसेप्शन देणार आहेत. सूत्रांच्या मते, रिसेप्शनसाठी साउथ मुंबईतील लोअर परेलस्थित हॉटेल पॅलेडियम बुक करण्यात आले आहे.
मसाबा गुप्ता डिझाइन करणार वर-वधूचे ड्रेस
शाहिद आणि मीराचे लग्न आणि रिसेप्शनचे कपडे डिझायनर मसाबा गुप्ता डिझाइन करत आहे.
लग्नात व्हेज आणि रिसेप्शनमध्ये दोन्ही प्रकारचे जेवण
बातम्यांनुसार, शाहिद आणि मीराच्या लग्नात केवळ व्हेज जेवण असणारेय. मात्र रिसेप्शनला आलेल्या पाहुण्यांसाठी व्हेज आणि नॉनव्हेज जेवण असणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, लग्नांच्या विधींसाठी आणि रिसेप्शनसाठी बुक करण्यात आलेल्या दोन्ही हॉटेल्सचे इनसाइड फोटोज...