आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलासोबत लग्न करतेय शाहिदची सावत्र बहीण, अशी समोर आली बातमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहिद कपूरची धाकटी बहीण सना कपूर हिचा साखरपुडा झाला आहे. एका परफॉर्मिंग आर्टिस्टसोबत गुपचूप साखरपुडा केल्याचे म्हटले जातेय. करण जोहरच्या 'शानदार' या चित्रपटाने भाऊ शाहिदसह बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या सनाने अभिनेता मयंक पाहवा याच्याशी साखरपुडा केल्याची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. मयंक हा अभिनेता मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांचा मुलगा आहे. 

असा झाला खुलासा... 
दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता पुरी यांनी चुकून या गोष्टीचा खुलासा केला. नंदिता यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेले, की आम्ही पंकज कपूर यांची मुलगी आणि पाहवा यांच्या मुलाच्या साखरपुड्याला जाणार होतो. ओम यांनी मला फोन केला होता. पण मी तेथे पोहचण्याआधीच ते घरी आले होते. अशा प्रकारे पंकज कपूर यांच्या मुलीचा म्हणजेच सनाचा साखरपुडा झाल्याचे वृत्त समोर आले.

नंदिताच्या या मुलाखतीनंतर ही बातमी बॉलिवूडमध्ये वा-यासारखी पसरली आहे. अद्याप शाहिद कपूर किंवा पंकज कपूर यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सनाचे तिच्या फॅमिलीसोबतचे फोटोज..