आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE PHOTOS: लग्नानंतर शाहिदने मीरासोबत घेतला SELFIE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मीरासोबतचा शाहिदने शेअर केलेला सेल्फी)
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत मंगळवारी अर्थातच 7 जुलैला विवाहबंधनात अडकले. बातम्यांनुसार 7 जुलैला सकाळी 11 वाजता लग्नाचा मुहूर्त होता आणि लग्नाच्या सर्व विधी आणि कार्यक्रम छतरपूर फार्महाऊसवर झाले. लग्नानंतर शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत एक सेल्फी काढून आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केला. फोटोसोबत कॅप्शन दिले, 'Hitched'.
सांगितले जाते, की सेरेमीदरम्यान जवळपास 40 पाहूणे उपस्थित होते. त्यामध्ये शाहिद आणि मीराच्या कुटुंबीयांचे नातेवाईक होते. लग्नानंतर शाहिद आणि मीराने मीडियाची भेट घेतली. यादरम्यान शाहिद कुणाल रावलने डिझाइन केलेला व्हाइट शेरवानी आणि मीरा अनामिका खन्नाने डिझाइन केलेला बेबी पिंक लहंगा परिधान केलेला होता.
शाहिद आणि मीराचे वेडिंग रिसेप्शन गुडगावच्या हॉटेल ऑबेरॉयमध्ये आयोजित करण्यात आले होते. या रिसेप्शनमध्ये कुटुंबीय आणि जवळचे काही फ्रेंड्स दिसले. 12 जुलै रोजी मुंबईमध्ये बॉलिवूड सेलेब्स आणि इतर फ्रेंड्ससाठी ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असल्याचे असे सांगितले जाते आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, शाहिद-मीराच्या लग्नाचे काही Inside Photos...