आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुपचुप रेमीशगाठीत अडकणार चॉकलेट बॉय शाहिद, 10 जूनला होऊ शकते लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- मीरा राजपूत)
मुंबई- मागील महिन्यात बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरविषयी बातमी आली होती, की त्याने दिल्लीच्या मीरा राजपूतसह गुपचुप साखरपुडा केला. मात्र शाहिेदने या बातम्यांना नाकारले होते. परंतु तो डिसेंबर महिन्यात लग्न करणार असे सांगितले होते. आता बातमी आहे, की शाहिद साखरपुड्याप्रमाणेच गुपचुप पध्दतीने लग्नसुध्दा करणार आहे. बातमीनुसार, शाहिद आणि मीराचे लग्न 10 जून रोजी होणार आहे.
सांगितले जाते, की शाहिद आणि मीरा कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थित रेशीमगाठीत अडकणार आहेत. त्यानंतर एक ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले जाईल. त्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील सेलेब्स आणि फ्रेंड्स सामील होणार आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार, लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. लग्नाची तारिख कदाचित बदलूही शकते. कारण कुटुंबीय या तारखेचा विचार करत आहेत.
बातम्यांनुसार, मीरा नवी दिल्लीच्या श्रीराम कॉलेजात शिक्षण घेत आहे. तिने आपले शालेय शिक्षण दिल्लीच्या वसंत व्हॅली स्कूलमधून पूर्ण केले आहे. मीरा आणि शाहिदची भेट एका सत्संगवेळी झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मीराची खास छायाचित्रे...