आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशात नव्हे, दिल्लीत होणार शाहिद-मीराचे लग्न, तारखेत झाला बदल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंटरनेटवर शाहिद आणि मीराचा फोटो, हा फोटो फोटोशॉपमध्ये तयार करण्यात आला आहे.)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्ली गर्ल मीरा राजपूत यांच्या रिसेप्शनची तारिख आली आहे. बातम्यांनुसार, 13 जुलै रोजी त्यांचे रिसेप्शन मुंबईमध्ये होईल. सांगितले जाते, की रिसेप्शन बीचच्या आसपासच्या एखाद्या लग्जरी हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. यामध्ये संपूर्ण बॉलिवूडकरांना आमंत्रित केले जाणार आहे.
लग्नाच्या तारखेत बदल-
जेव्हापासून शाहिद आणि मीरा यांचा साखरपुडा झाला आहे, तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या तारखेवर सस्पेंस आहे. यापूर्वी बातम्या आल्या होत्या, की त्यांचे लग्न जून महिन्यातच होणार आहे, नंतर 10 जूनची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी 10 जुलैला दोघे लग्नगाठीत अडकणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु आताची ताजी चर्चा आहे, की त्यांच्या लग्नाचा समारंभ 5-6 जुलैपासून सुरु होणार आहे.
दिल्लीमध्ये होणार लग्न-
आतापर्यंत शाहिद आणि मीरा यांच्या वेडिंग प्लेसविषयी अनेक बातम्या आल्या आहेत. साखरपुड्यानंतर चर्चा होती, की ते बालीमध्ये लग्न करणार आहेत. पुन्हा बातम्या आल्या, की ते ग्रीक मध्ये खासगी समारंभात लग्न करणार आहेत. परंतु आता ऐकिवात आहे, की शाहिद-मीराने नेटीव्ह प्लेस, दिल्लीमध्ये लग्न करणार आहेत. कथितरित्या या लग्न कुटुंबीयांव्यरितिक्त शाहिदचे सावत्र वडील राजेश खट्टारसुध्दा उपस्थित होते.
लग्नात वाढले जाणार शाकाहारी जेवण-
बातम्यांनुसार, शाहिद-मीराच्या लग्ना पाहूण्यांना शाकाहारी जेवण वाढले जाणार आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, शाहिद शाकाहारी आहे म्हणून साधे मेन्यू ठेवलेत असे नाहीये. वर आणि वध दोघांच्या कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार मेन्यू ठरवण्यात आले आहेत. दोन्ही कुटुंबीय राधा स्वामी सत्संग व्यासचे अनुयायी आहेत. लग्ना त्यांचे गुरुसुध्दा सामील होणार आहे. त्यामुळे त्यांनी लग्नात शाकाहारी पदार्थ ठेवण्याचा निर्णय घेतला.
रिसेप्शनमध्ये होणार दोन प्रकारचे जेवण-
एकिकडे चर्चा आहे, की हे लग्न एक खासगी समारंभ आहे, त्यामध्ये केवळ कुटुंबीयांशिवाय शाहिद आणि मीराचे निवडक मित्र उपस्थित राहणार आहेत. तसेच ऐकिवात आहे, की लग्नानंतर शाहिदने एका रिसेप्शन देण्याची योजनसुध्दा आणखी आहे, त्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोनही प्रकारचे मेन्यू सामील केले जाणार आहे.
पाहूण्यांचे नावसुध्दा येताहेत समोर-
आता लग्नात सामील होणा-या पाहूण्यांविषयी बोलायचे झाले तर बातमी आहे, की निर्माता विशाल भारव्दाज, कुणाल कोहली, विकास बहल आणि निर्माता मधु मंतेनासह निवडक सेलेब्स लग्नात पोहोचू शकतात. फायनल लिस्ट अद्याप बाकी आहे.
शाहिदपेक्षा वयाचे 11 वर्षे लहान आहे मीरा
शाहिद आणि मीराचा साखरपुडा 14 जानेवारीला मकर संक्रांतीवेळी झाला होता. मात्र मीडियापासून गुपात ठेवण्यात आले होते. सूत्रांच्या सांगण्यानुसार, मीरा जवळपास 23 वर्षांची असून शाहिद 34 वर्षांचा आहे. अर्थातच मीरा शाहिदपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे.
इंटरनेटवर दोघे आतापासूनच एकत्र-
इंटरनेटवर शाहिद आणि मीरा यांना सर्च केले तर दोघांचे एकत्र अनेक फोटो मिळतील. मात्र त्यामधील अनेक फोटो फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आलेले आहेत.
divyamarathi.com तुम्हाला शाहिद आणि मीराचे फोटोशॉपच्या मदतीने तयार केले फोटो दाखवत आहे...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...