आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE : शाहिद-मीराचे लग्नानंतर नो हनीमून प्लान्स, लग्नापूर्वीच मलेशियात एन्जॉय केली सुटी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः शाहिद कपूर आणि मीरा राजपूत)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची तरुणी मीरा राजपूत यांच्या लग्नाला आता अवघा एक महिना शिल्लक आहे. 10 जुलै रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नात वर-वधूच्या कुटुंबासह काही निवडक मित्र सहभागी होणार आहेत. लग्नानंतर ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद आणि मीरा लग्नानंतर हनीमूनला जाणार नाहीयेत. याचे कारण शाहिदचा आगामी 'शानदार' हा सिनेमा आहे.
लग्नाच्या कार्यक्रमांतून फ्री होताच शाहिद त्याची को-स्टार आलिया भटसोबत 'शानदार' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होणारेय. लग्नानंतर मीरा शाहिदसोबत जुहूस्थित नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होणारेय. शाहिदने गेल्याचवर्षी हा फ्लॅट खरेदी केला आहे.
लग्नापूर्वी मलेशियाची ट्रीप
शाहिद आणि मीरा यांच्याकडे हनीमूनसाठी वेळ नाहीये. मात्र त्यापूर्वीच दोघांनी मलेशियाची सैर केली. अलीकडेच मलेशियात आयफा अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद मीराला आपल्यासोबत मलेशियाला घेऊन गेला होता. यावेळी दोघे मीडियापासून लांब राहिले. शाहिदने मीरासाठी वेगळ्या हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. दोघांसाठी हा काळ मिनी व्हेकेशनचा होता.
लग्नात असेल शाकाहारी जेवण
शाहिद आणि मीराच्या लग्नात शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल राहणार असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात पाहुण्यांना शाकाहारी पदार्थ वाढण्याचा निर्णय शाहिद शाकाहारी असल्यामुळे नव्हे तर वर आणि वधूच्या पालकांनी मिळून घेतला आहे. दोन्ही कुटुंब राधा स्वामी सत्संग व्यासचे अनुयायी आहेत. लग्नात त्यांचे गुरुसुद्धा सहभागी होणार आहेत. त्यामुळे लग्नात शाकाहारी पदार्थ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिसेप्शनमध्ये असेल दोन्ही प्रकारचे जेवण
शाहिद आणि मीराचे लग्न खासगी समारंभ असणारेय. या लग्नात कुटुंबीय आणि शाहिद-मीराचे निवडक मित्र सहभागी होणार आहेत. मात्र लग्नानंतर बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टी देण्यात येणार आहे. या रिसेप्शनमध्ये शाकाहारी आणि मासांहारी जेवण ठेवण्यात येणार आहे.
पाहुण्यांची नावे झाली उघड
आता बोलुयात, शाहिदच्या लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांविषयी. बातमी आहे, की लग्नात बॉलिवूडमधून विशाल भारद्वाज, कुणाल कोहली, विकास बहल आणि निर्माते मधु मंतेना सहभागी होणार आहेत. अद्याप फायनल लिस्ट आलेली नाही.
मीरापेक्षा वयाने 11 वर्षे मोठा आहे शाहिद
शाहिद आणि मीराचा साखरपुडा यावर्षी 14 जानेवारीला झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीराचे वय 23 वर्षे आहे. तर शाहिदने वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. अर्थातच मीरा शाहिदपेक्षा तब्बल 11 वर्षांनी लहान आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मीरा राजपूतची मित्र-मैत्रिणींसोबतची निवडक छायाचित्रे...