आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स-गर्लफ्रेंड्सना शाहिद देणार नाही लग्नाचे निमंत्रण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः पुढील महिन्यात अभिनेता शाहिद कपूर लग्नगाठीत अडकणारेय. लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांची यादी तयार झाली आहे. लग्नात शाहिदच्या कुटुंबीयांसह जवळचे काही मित्र सहभागी होणार आहेत. मात्र 12 जुलै रोजी होणा-या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील बरीच मंडळी सहभागी होणार असल्याचे समजते.
रिसेप्शनला शाहिद त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर खानला आमंत्रित करणार असल्याची शक्यता होती. शिवाय प्रियांका चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र या तिघींनाही शाहिद रिसेप्शनमध्ये बोलावणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाहिदच्या जवळच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो आपल्या कोणत्याही एक्स गर्लफ्रेंडला लग्नात बोलावणार नाहीये. प्रेमात तो अपयशी ठरला. आता तो आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे, त्यामुळे भूतकाळाची सावली त्याला त्याच्या वर्तमानकाळावर पडू द्यायची नाहीये.