आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्हर बॉय शाहिदचे तब्बल 5 अॅक्ट्रेससोबत होते अफेअर, जाणून घ्या कोण होत्या त्या?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहिद कपूर आज मीरा राजपुतसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. मीराचा फिल्म इंडस्ट्री काही एक संबंध नाहीये. ती लाइमलाइटपासून चार हात लांब आहे. शाहिदलासुध्दा आपली पत्नी अशीच हवी होती. 'कॉफि विथ करन' शोमध्ये शाहिदने पत्नी कशी हवी याचा खुलासा केला होता.
शाहिदचे नाव फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत जुळले. मात्र यात किती सत्यता होती, त्यालाच ठाऊक. शाहिदने अनेक सौंदर्यवतींसोबत ऑनस्क्रिन रोमान्सदेखील केला आहे. अमृता राव, प्रियांका चोप्रा, राणी मुखर्जी यांच्यासह तो रुपेरी पडद्यावर झळकला आहे. करीना कपूर, अमृता राव, प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींसोबतच्या त्याच्या अफेअरने बरीच चर्चा एकवटली होती. मात्र शाहिद नेहमीच त्याचे अफेअर्स नाकारत आला. अखेर त्याने आयुष्याची जोडीदार म्हणून मीराची निवड केली.
आज आम्ही तुम्हाला शाहिदच्या चर्चेत आलेल्या अफेअर्सविषयी सांगत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या अभिनेत्रींसोबत जुळले होते शाहिदचे नाव...