मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याचवर्षी लग्नगाठीत अडकला. त्याची पत्नी मीरा राजपूत हिचा बॉलिवूडशी काहीह संबंध नाहीये. ती दिल्लीतील एक सामान्य तरुणी आहे. मात्र ही सामान्य तरुणी स्टाइलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा मुळीच मागे नाहीये. याचा प्रत्यय अलीकडेच आला. मुबंईत नुकताच फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिची प्री वेडिंग पार्टी पार पडली. या पार्टीत शाहिद पत्नी मीरासोबत पोहोचला होता. यावेळी मीराचे रुप बघून सगळेच अवाक् झाले.
मीराने क्रीम कलरचा डीप नेक आउटफिट परिधान केला होता. तिचा हा ड्रेस बराच ट्रान्सपरंट होता. या ड्रेसमधून मीराचे क्लीवेज स्पष्ट दिसत होते. शिवाय तिच्या पाठीवर टॅटू असल्याचेही यावेळी दिसले. कमळाच्या फुलाच्या आकाराचा टॅटू मीराच्या खांद्यावर आहे. एकंदरीतच तिचा हा लूक बराच स्टायलिश होता.
एकंदरीतच काय तर भविष्यात स्टायलिश मीरासुद्धा मोठ्या पडद्यावर दिसली, तर आश्चर्य वाटायला नको.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहिद आणि मीरासोबतच मसाबा गुप्ताच्या पार्टीतील इनसाइड फोटोज...