आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळद, संगीत सेरेमनीपासून लग्न, रिसेप्शनपर्यंत, पाहा शाहिद-मीराचा Wedding Album

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहिद आणि मीरा 7 जुलैला पंजाबी प्रथेनुसार विवाह बंधनात अडकले. हे अरेंज मॅरेज असून दोघांनी भेट कुटुंबीयांच्या माध्यमातून झाली. मिळालेल्या माहितीनुसार, फक्त 40 पाहुण्यांच्या उपस्थितीत शाहिद आणि मीराचा विवाह मुहूर्तावर थाटात पार पडला. सकाळी अकरा वाजेचा विवाह मुहूर्त होता. छतरपूर येथील एका फार्महाऊसमध्ये विवाहाचे सर्व विधी आटोपले. शाहिद आणि मीरा यांचे वेडिंग रिसेप्शन गुडगावमधील हॉटेल ओबेरॉयमध्ये झाले.
लग्नानंतर शाहिदने मीराला मीडियासमोर आणले. शाहिद आणि मीराच्या हळद, संगीत सेरेमनीपासून लग्न आणि रिसेप्शनचे अनेक फोटो समोर आले. या फोटोंमध्ये दोघांची जोडी शोभून दिसतेय. मीराने चारही सेरेमनीसाठी विविध मेकअप करून वेग-वेगळे आऊटफिट्स परिधान केले होते. तसेच शाहिदनेसुध्दा लग्नासाठी शेरवानी परिधान केली होती आणि इतर फंक्शनसाठी तो विविध आऊटफिट्स दिसला.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज शाहिद-मीराच्या हळद-संगीत सेरेमनीपासून ते लग्न आणि रिसेप्शनपर्यंतची विविध छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहिद आणि मीराचा वेडिंग अल्बम...