आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत शाहरुख खानच्या 'मन्नत'चे FAKE आणि REAL PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख 52 वर्षांचा झाला आहे. आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुखने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. दिल्लीचा हा एक सामान्य तरुण जेव्हा अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत दाखल झाला तेव्हा त्याच्या खिशात निव्वळ 300 रुपये होते आणि राहायला घरही नव्हते. आज हाच अभिनेता कोट्यवधी किंमत असलेल्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्यात राहतो. 1995 साली विकत घेतलेल्या बंगल्याला शाहरुखने ‘मन्नत’ हे नाव दिले. त्याकाळी त्याने 15 कोटींना घेतला होता. आज या बंगल्याची किंमत तब्बल 200 कोटी रुपये इतकी आहे. 6000 चौरस फुटांच्या या बंगल्यात बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम आहे. या बंगल्याचे इंटेरियर स्वतः शाहरुखची पत्नी गौरी खान हिने केलंय. 
 
शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याची बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत. विशेष म्हणजे, यातील काही फोटो असे आहेत, जे शाहरुखच्या बंगल्याची नाहीत. परंतु लोक त्याला खरे मानतात. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शाहरुखच्या बंगल्याचे REAL आणि FAKE फोटो दाखवणार आहोत.

बंगल्यात आहे पाच बेडरुम्स.. 
शाहरुख-गौरीच्या या बंगल्याची रचना 1920च्या दशकातील ग्रेड 3 हेरीटेजप्रमाणे आहे. या बंगल्यात पाच बेडरुम आहेत. याशिवाय मल्टीपल लिव्हिंग एरिया, एक जिम, लायब्ररीसारख्या सर्व सुखसुविधा या घरात उपलब्ध आहेत. एखाद्या सेलिब्रिटीची लाइफस्टाइल मेंटेन करणारी प्रत्येक गोष्ट या घरात उपलब्ध आहे.

गौरीने स्वत: केले इंटेरिअर डिझाइन...
या बंगल्याचे स्टायलिंगचे काम स्वतः गौरीने केले आहे. ती सांगते, की घर सजवण्यासाठी तिला तब्बल चार वर्षे लागली. ट्रॅव्हलिंगदरम्यान वेगवेगळ्या शहर, देशांतून तिने आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करुन घराची प्रत्येक बाजू सजवली आहे. यानंतरच गौरीने स्वतः इंटेरियर डिझायनर म्हणून काम सुरु केले. लिव्हिंग स्पेस जेवढी स्टायलिश ठेवण्यात आली आहे, तितकीच प्रायव्हेट स्पेस गौरीने साधी ठेवली आहे. गौरीने येथे प्रॅक्टिकल फर्नीचर ठेवले आहे. सोबतच पुस्तके आणि बोर्ड गेम खेळण्याची जागा आहे. येथे कुटुंबाचा एक मोठा फोटोसुद्धा लावण्यात आला आहे. गौरी म्हणते, घर लहान असो किंवा मोठे, घर हे घर असते. तेथे तुम्हाला समाधान लाभतं.  

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखच्या मन्नतचे REAL आणि FAKE फोटो...
बातम्या आणखी आहेत...