आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या अफेअरविषयी बोलला शाहरुख, 'मला ठाऊक नाही कुणाला डेट करतोय'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख आणि दूस-या फोटोमध्ये मिस्ट्री गर्ल, तिच्यासोबत आर्यन अलीकडेच ग्रॅज्युएशन पार्टीदरम्यान दिसला होता. - Divya Marathi
शाहरुख आणि दूस-या फोटोमध्ये मिस्ट्री गर्ल, तिच्यासोबत आर्यन अलीकडेच ग्रॅज्युएशन पार्टीदरम्यान दिसला होता.
मुंबई: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणा-या स्टार किड्समध्ये आर्यन एक पाऊल पुढे आहे. गेल्या काही दिवसांपासून तो एका मिस्ट्री गर्लला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही तरुणी त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगण्यात आले आहे. याविषयी त्याचे वडील शाहरुख खानला विचारल्यानंतर तो म्हणतो, 'मला माहित नाहीत आर्यन कुणाला डेट करतोय. माझी मुले माझ्यासोबत मित्रासारखी वागतात. आमच्या आयुष्यात काहीही अडचणी आल्या किंवा काहीतरी नवीन करायचे असेल तर चर्चा करून केले जाते. परंतु आर्यनची आई गौरी यात माझ्यापेक्षा जास्त चांगली भूमिका बजावते.'
कदाचित गौरीला माहित असेल...
शाहरुखच्या सांगण्यानुसार, मी कधीच मुलांना त्यांच्या पर्सनल नात्याविषयी किंवा डेटींगविषयी प्रश्न विचारले नाहीत. ते जोपर्यंत स्वत:हून सांगणार नाहीत तोपर्यंत विचारणार नाही. आर्यन कुणाला डेट करतोय हे कदाचित गौरीला माहित असेल.
आर्यन नव्या पुन्हा एकत्र...
काही दिवसांपूर्वी आर्यन आणि बिग बींनी नात नव्या नवेली नंदाचा एक एमएमएस लीक झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ फेक असल्याचे सांगण्यात आले. यावेळीसुध्दा असेच झाले. मात्र, हा एमएमएस नाहीये, परंतु त्यापेक्षा कमी नाहीये. आर्यन आणि नव्याचे थायलँड व्हॅकेशन इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरले आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या फोटोंमध्ये दोघे सोबत दिसत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आर्यन, मिस्ट्री गर्लचे फोटो, जे मीडियावर व्हायरल होत आहेत...
बातम्या आणखी आहेत...