आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्या भितीमुळे शर्मिला टागोरांनी काढले होते मुंबईत लागलेले बिकिनीतील पोस्टर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('अॅन इव्हनिंग इन पेरिस'चे पोस्टर आणि सिनेमात शर्मिला टागोर) - Divya Marathi
('अॅन इव्हनिंग इन पेरिस'चे पोस्टर आणि सिनेमात शर्मिला टागोर)
8 डिसेंबर म्हणजे अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा वाढदिवस. शर्मिला बॉलिवूडमध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री म्हणूनसुध्दा त्यांना ओळखले जाते. शर्मिला टागोर खुल्या विचारांच्या आहेत. परंतु त्यांची सासू नवाबी घराण्यातून असल्याने पारंपारिक विचाराच्या होत्या. त्यांच्या हट्टापायी शर्मिला यांना नवाब पटौदीसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागला.
भोपाळमध्ये नवाब कुटुंबांच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितले, की शर्मिला नेहमी प्रयत्न करत होत्या, की कोणत्याही परिस्थितीत सासू साजिदा सुल्तान नाराज होणार नाहीत.

सासूच्या भितीने काढले बिकिनी पोस्टर
भोपाळचे नवाब कुटुंबाच्या जवळील एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर divyamarathi.comला सांगितले, की 1967मध्ये नवाब पटौदीची आई साजिदा सुल्तान शर्मिलाला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा शर्मिला यांचा बहुचर्चित 'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमा प्रदर्शित होणार होता. या शर्मिला यांनी बिकिनी परिधान केली होती. शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर मुंबईमध्ये ठिक-ठिकाणी लागले होते. शर्मिला यांना नवीब पटौदी यांच्या आई मुंबईला येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स काढून टाकण्यास सांगितले होते. शर्मिला यांना भिती वाटत होती, की हे पोस्टर्स पाहून नवाब पटौदी यांची आई नाराज होऊ नये.

सेन्सॉर बोर्डच्या चेअरपर्सन होत्या, तेव्हा व्यक्त केली होती अंगप्रदर्शनावर चिंता
शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष होत्या. या पदावर कार्यरत असताना आजच्या काळात होणा-या अंगप्रदर्शनावर त्यांनी चिंता व्यक्त केली होती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, शर्मिला यांची जूनी छायाचित्रे..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...