आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shasha Reception: Meet The Person Who Has Always Been By Shahid Kapoor\'s Side

Receptionमध्ये सतत शाहिदच्या अवतीभोवती होती ही व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडून - मन्सूर, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत)
मुंबई- बॉलिवूड स्टार शाहिद कपूरने 12 जुलै रोजी मुंबईत आपल्या लग्नाच्या निमित्ताने एक ग्रॅण्ड पार्टी ठेवली होती. या पार्टीत बॉलिवूडकरांची मांदियाळी जमली होती. या पार्टीत एक व्यक्ती सतत शाहिदच्या अवतीभोवती दिसली. वरील छायाचित्रात शाहिद-मीराच्या शेजारी उभी असलेली ही व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतोय या व्यक्तीविषयी..
ही व्यक्ती शाहिद किंवा मीराचा कुणी नातेवाईक नाहीये. मात्र या व्यक्तीला शाहिदच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. या व्यक्तीचे नाव आहे मन्सूद आणि हे शाहिदचे पर्सनल असिस्टंट आहेत.
शाहिदने 'इश्क विश्क' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून मन्सूद शाहिदसोबत आहेत. त्याचे सर्व काम तेच सांभाळतात. मन्सूद नेहमीच शाहिदसोबत त्याच्या शूटिंग सेटवरसुद्धा हजर असतात.
शाहिदच्या लग्नात मन्सूद त्याच्यासोबतच दिसले आणि या नवदाम्पत्यासोबत फोटोग्राफर्सना त्यांनी पोजही दिली.इतकेच नाही तर शाहिद दिल्लीत ज्या फाइव्ह स्टारमध्ये थांबला होता, त्याच हॉटेलमध्ये त्याने मन्सूद यांच्यासाठीही रुम बुक केली होती.
शाहिदने आपल्या पर्सनल स्टाफला गिफ्टच्या रुपात प्रत्येकी दोन सूट दिले आहेत.
(पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहिद-मीराच्या रिसेप्शनमधील काही निवडक छायाचित्रे... )