आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबा शशी कपूर यांच्या प्रार्थना सभेला करीनाची दांडी, हे होते यामागचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः कपूर कुटुंबीयांच्या वतीने 7 डिसेंबर रोजी मुंबईतील पृथ्वी थिएटर येथे दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थनाला सभेला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावून शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर, बबीता, करिश्मा कपूर, नीतू सिंग यांच्यासह कपूर कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. पण अभिनेत्री करीना कपूर, रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यावेळी गैरहजर दिसले. 


करीना का नव्हती उपस्थिती? हे आहे यामागचे कारण... 
7 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 7 यावेळेत शशी कपूर यांची प्रेयर मीट ठेवण्यात आली होती. यावेळी करीना कपूर वांद्रा येथे शूटिंगमध्ये बिझी होती. करीनाची शूटिंग डेट खूप आधी निश्चित झाली होती. त्यामुळे ऐनवेळी करीना शूटिंग रद्द करु शकली नाही. शो मस्ट गो ऑन म्हणत करीनाने शूटिंग पूर्ण केले. तर दुसरीकडे रणबीर कपूर शूटिंगच्या निमित्ताने परदेशी रवाना झाला, तर ऋषी कपूर दिल्लीत शूटिंगमध्ये बिझी होते. 


प्रार्थना सभेते पोहोचले हे कलाकार... 
रणधीर कपूर आणि त्यांची पत्नी बबिता, शम्मी कपूर यांच्या पत्नी नीलादेवी, रिमा जैन, शशी कपूर यांची कन्या संजना कपूर, तिचे पती वाल्मिक थापर यांच्यासह हेमा मालिनी, रेखा, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, राकेश रोशन, जितेंद्र, गुलजार, सोनी राजदान, जुही बब्बर, प्रेम चोप्रा, डिंपल कपाडिया, कुणाल खेमू, सोहा अली खान, चंकी पांडे, गुलजार, सीमी गरेवाल, वहिदा रहमान, तारा शर्मा या कलाकारांनी आपल्या लाडक्या कलाकाराला श्रद्धांजली वाहिली.   


पुढील स्लाईड्सवर बघा, शूटिंगवेळी क्लिक झालेली करीनाची छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...