Home »Gossip» Shashi Kapoor Son Karan Kapoor A Successful Photographer Based In London

भेटा शशी कपूर यांच्या या मुलाला, अभिनयापासून दूर या कामात मिळवतोय वाहवाह

दिव्य मराठी वेब टीम | Dec 06, 2017, 10:33 AM IST

अनेक दशकं हिंदी सिनेसृष्टी आणि सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शशी कपूर आता आपल्यात नाहीत. 4 डिसेंबर रोजी दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुलांवर कधीच लादले नाहीत स्वतःचे निर्णय...
ब्रिटिश अभिनेत्री जेनिफर केंडलसोबत लग्न करणारे शशी कपूर बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर घराण्यातून होते. पृथ्वीराज कपूर यांचे धाकटे चिरंजीव आणि राज कपूर, शम्मी कपूर यांचे ते भाऊ होते. पत्नी जेनिफरच्या मृत्यूनंतर शशी यांनी त्यांची तीन मुले करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर यांची देखभाल केली. त्यांनी कधीही स्वतःचे निर्णय मुलांवर लादले नाहीत. त्यांच्या या तिन्ही मुलांनी सिनेसृष्टीपासून दूर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

करण कपूर हा शशी आणि जेनिफर यांचा सगळ्यात लहान मुलगा आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार किड्स आईवडिलांप्रमाणे सिनेसृष्टीत नाव कमावू इच्छितात. पण शशी कपूर यांच्या या मुलाने मोठ्या पडद्यावर नव्हे तर दुस-या प्रोफेशनमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

सिनेसृष्टीत नव्हे फोटोग्राफीत आहे रुची...
खरं तर करण कपूरनेसुद्धा काही चित्रपटांमध्ये अभिनय केला खरा, पण त्याचे चित्रपट चालले नाहीत. 1978 मध्ये श्याम बेनेगल यांच्या 'जूनन' या चित्रपटाद्वारे करणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1984 मध्ये इंग्लिश टीव्ही सीरिजमध्ये काम केल्यानंतर 'सल्तनत' (1986), 'लोहा' (1987) आणि 'अफसर' (1988) या चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला. पण त्याला या क्षेत्रात फारसे यश मिळाले नाही. करणला मुळात अभिनयात रुची नव्हती. एका मुलाखतीत करण म्हणाला होता, की हिंदी नीट बोलता येत नसल्याने अॅक्टिंग करताना त्याला अडचण येत होती. शिवाय ब्रिटिश लूकमुळेसुद्धा त्याला हिंदीत फारसे यश मिळाले नाही.

वयाच्या 18 वर्षी दाखवले फोटोग्राफी टॅलेंट

करण कपूरला फोटोग्राफीत रुची होती. शालेय जीवनातच त्याची ही आवड निर्माण झाली होती. 1980 ते 1983 या काळात करणने एंग्लो इंडियन सीरीज सुरु केली होती. वयाच्या 24 व्या वर्षी पर्यंत तो फोटोग्राफीत माहिर झाला होता.

नावाजलेल्या फोटोग्राफर्समध्ये गणला जातो शशी कपूर यांचा हा मुलगा...
आज करणची गणना जगभरातील प्रसिद्ध फोटोग्राफर्समध्ये केली जाते. त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शनसुद्धा लागते. टाइम अँड टाइड नावाने मागील वर्षी त्याने मुबंईत त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावले होते. करण लंडनमध्ये स्थायिक आहे. त्याने 'बॉम्बे डाइंग'साठी मॉडेलिंगसुद्धा केले होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, करण कपूरची निवडक छायाचित्रे...

Next Article

Recommended