आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: ही आहेत शशी कपूर यांची नातवंडे, पत्नी होती त्यांच्यापेक्षा वयाने 5 वर्षांनी मोठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे  - (वर) - शशी कपूर यांची नातवंडे - झेक आणि आलिया. ही दोघे करण कपूरची मुले आहेत. , (खाली) -  पत्नी जेनिफर आणि तिन्ही मुलांसोबत शशी कपूर, उजवीकडे - शशी कपूर - Divya Marathi
डावीकडे - (वर) - शशी कपूर यांची नातवंडे - झेक आणि आलिया. ही दोघे करण कपूरची मुले आहेत. , (खाली) - पत्नी जेनिफर आणि तिन्ही मुलांसोबत शशी कपूर, उजवीकडे - शशी कपूर
एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांनी आज आपल्या वयाची 78 वर्षे पूर्ण केली आहेत. 18 मार्च 1938 रोजी त्यांचा जन्म झाला. शशी कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. शशी कपूर यांच्या सिनेमांविषयी त्यांच्या चाहत्यांना बरेच काही ठाऊक आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना फार काही ठाऊक आहे, असे नाही. शशी यांनी परदेशी युवतीसोबत लग्न केले होते. 1958 मध्ये जेनिफर कँडलसोबत संसार थाटला. हे 50च्या दशकातील सर्वाधिक चर्चेतील लग्न आहे. कारण जेनिफर परदेशी आणि दुस-या धर्माची होती.
आज शशी कपूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या पत्नी आणि मुलांविषयी सांगत आहोत. शशी आणि जेनिफर यांची तिन्ही मुले फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवू शकलेले नाहीत.

शशी कपूर यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेऊयात...
शशी कपूर
पत्नी- जेनिफर केन्डल
मुलगा - करण कपूर
मुलगा- कुणाल कपूर
मुलगी - संजना कपूर
संजना कपूर
पती -
वाल्मिक थापर
मुलगा - हमीर थापर
कुणाल कपूर
पत्नी -
शीना सिप्पी (पत्नीसोबत झालाय कुणालचा घटस्फोट)
मुलगा - जहान
मुलगी - सारा
करण कपूर
पत्नी - लोरना
मुलगा - झेक
मुलगी - आलिया कपूर
पुढील स्लाईडमध्ये वाचा, पत्नी जेनिफरसोबत कशी झाली होती शशी कपूर यांची भेट...
बातम्या आणखी आहेत...