आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरसुध्दा शत्रुघ्न यांचे रीना रॉसोबत होते संबंध, पत्नी पूनमला सर्वकाही होते ठाऊक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. शुत्रघ्न सिन्हा यांनी 9 जुलै 1980 रोजी माजी मिस यंग इंडिया राहिलेल्या पूनम चंडीरामणी (आता सिन्हा) यांच्याशी लग्न केले. याच काळात शत्रुघ्न यांचे नाव अभिनेत्री रिना रॉयसोबत जुळले होते. एका मुलाखतीत स्वतः शत्रुघ्न यांनी रीनासोबत सात वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती.  विशेष म्हणजे, शत्रुघ्न यांची पत्नी पूनम यांना या अफेअरविषयी सर्वकाही ठाऊक होते.

शत्रुघ्न यांच्या लग्नाने अचंबित झाल्या होत्या रीना-
बॉलिवूडमध्ये रीना यशोशिखरावर होत्या, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत होते. काही कामानिमित्त रिना लंडन गेल्या होत्या. त्यावेळी शत्रुघ्न यांनी पूनमसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. रिना यांना या लग्नाविषयी माहित झाल्यानंतर त्या भडकल्या आणि भारतात येऊन याचे उत्तर मागितले. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरसुध्दा शत्रुघ्न रिना यांना भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत झाला. दोघांचे नाते का संपुष्टात आले, याचे उत्तर आजही कुणाकडे नाहीये.

शत्रुघ्न आणि पूनम यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले,  'This picture is so beautiful that I have no words; except one thing to say.. Happy 37 years of togetherness ❤️✨'.

पुढील स्लाईड्सवर वाचा, शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय आणि पूनम सिन्हा यांच्याविषयी... 
 
बातम्या आणखी आहेत...