आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fat to Fit: 'दम लगा के हईशा'मध्ये लठ्ठ असलेल्या भूमीचा स्लिमट्रीम अवतार पाहून अवाक्!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - भूमी पेडणेकरचे पूर्वी आणि आत्ताचे रुप)
आयुष्मान खुराणा स्टारर 'दम लगा के हईशा' या सिनेमात एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात एक लठ्ठ तरुणी चक्क आयुष्मानच्या पत्नीच्या भूमिकेत होती. हा चेहरा पहिल्यांदाच प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर पाहिला. सिनेमात जाडजूड दिसणा-या या अभिनेत्रीचे नाव आहे भूमी पेडणेकर. या सिनेमातून भूमीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. आता पुन्हा एकदा भूमी चर्चेत आली आहे. मात्र सिनेमामुळे नव्हे तर आपल्या स्लिमट्रीम लूकमुळे.
'दम लगा के हईशा' या सिनेमासाठी भूमीने 15 किलो वजन वाढवले होते. तब्बल 85 किलो तिचे वजन झाले होते. मात्र आता आपल्या एका नवीन प्रोजेक्टसाठी भूमीने आपले बरेच वजन कमी केले असून ती खूप स्लिम दिसतेय. वरील छायाचित्रात तुम्ही भूमीचे पूर्वीचे आणि आत्ताचे रुप पाहू शकता. हे छायाचित्र बघता तिने 15 ते 20 किलो वजन कमी केल्याचे लक्षात येते. मात्र हे वजन तिने एकाच महिन्यात नव्हे तर गेल्या चार ते पाच महिन्यांत कमी केले आहे.
अलीकडेच भूमी अॅमेझॉन इंडिया कुटूर वीक या फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने हा नवीन लूक तिच्या नवीन सिनेमासाठी असल्याचे सांगितले. भूमी म्हणाली, "आगामी सिनेमात तुम्ही मला स्लिम मुलीच्या लूकमधअये बघाल. वजन कमी करण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली."
भविष्यात भूमीला इम्तियाज अली आणि विशाल भारद्वाज या दिग्दर्शकांसोबत काम करायची इच्छा आहे. आता भूमीचा हा नवीन लूक तिच्या कोणत्या सिनेमा बघायला मिळेल, हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, भूमीची यावर्षी फेब्रुवारी ते जुलै या काळात क्लिक झालेली छायाचित्रे...