आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: कॉलेजमध्ये असतानाच या अॅक्ट्रेसला मिळाली होती मॉडेलिंगची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अॅक्ट्रेस, मॉडेल शहनाज ट्रेजरी)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि ट्रॅव्हल रायटर शहनाज ट्रेजरी आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. कॉलेजमध्ये असताना एका फोटोग्राफरची नजर तिच्यावर पडली आणि तिला मॉडेलिंगची ऑफर मिळाली. एमटीव्ही नेटवर्क्स एशियाच्या एमटीव्हीज मोस्ट वाँटेड प्रोगामध्ये व्हिडिओ जॉकी म्हणून काम करण्यापूर्वी तिने काही जाहिरातींमध्ये काम केले होते.
पारसी फॅमिलीत जन्मलेली शहनाज ग्रॅज्युएशनंतर उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्कमध्ये गेली. येथे तिने ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म संस्थेतून मेथड अॅक्टिंगचे धडे गिरवले. याकाळातच तिने रायटिंगचा कोर्सही केला. भारतात परतल्यानंतर 2001 मध्ये तिला 'एढुरुलेनी मनिषि' या तामिळ सिनेमाची ऑफर मिळाली. या सिनेमाद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 2003 मध्ये 'इश्क विश्क' या सिनेमाद्वारे शहनाजला बॉलिवूडमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. या सिनेमात शाहिद कपूर आणि अमृता राव मेन लीडमध्ये होते. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले.
लेखनाची आवड
शहनाजला लेखनात विशेष रुची आहे. तिने अनेक ब्रॅण्डसाठी ट्रॅव्हल आर्टिकल्स लिहिले आहेत. याशिवाय काही ट्रॅव्हल शोजसुद्धा होस्ट केले आहेत. 2011 मध्ये रिलीज झालेल्या लव का द एंड या सिनेमाचा स्क्रिनप्ले शहनाजने लिहिला आहे. याशिवाय 'डेल्ही-बेली', 'मैं और मिस्टर राइट', 'हम-तुम', 'उमर', 'आगे से राइट', 'रेडियो' 'वन लाइफ टू लिव' या सिनेमांमध्ये अभिनयसुद्धा केलाय.
सामाजिक कार्यात अग्रेसर
शहनाज एक सामाजिक कार्यकर्तीसुद्धा आहे. महिलांचे हक्क आणि सुरक्षेसाठी ती काम करते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शहनाजची खास छायाचित्रे...