मुंबईः अभिनेत्री शिल्पा शेट्टीने
आपल्या डाव्या हातावर स्वस्तिकचा टॅटू बनवला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती टॅटू आर्टिस्टकडून हातावर टॅटू गोंदवून घेताना दिसतेय. फोटोसोबत तिने कॅप्शन दिले, "Getting my First Tatoo a Swastika"
शिल्पा शेट्टीने गोंदवलेला हा पहिलाच टॅटू आहे. शिल्पाच्या मते, स्वस्तिकमुळे तिच्या आत्मविश्वासात वाढ होईल. स्वस्तिकमुळे शांती मिळते आणि नकारात्मक गोष्टी नाहीशा होतात. याच कारणामुळे तिने टॅटूच्या रुपात स्वस्तिकची निवड केली.
तसे पाहता, केवळ शिल्पाच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री टॅटू क्रेझी आहेत. दिवसेंदिवस हा ट्रेंड वाढत चालला आहे. शिल्पाशिवाय अभिनेत्री दीपिका पदुकोण, कंगना रनोट, सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा खान, प्रियांका चोप्रा, सुश्मिता सेनसह अनेक अभिनेत्रींनी आपल्या शरीरावर टॅटू गोंदवून घेतला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या अभिनेत्री कसे टॅटू गोंदवून घेतले आहेत...