आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shilpa Shetty, SRK, Kareena Kapoor Khan And Many More Bollywood Stars Bought Property In Abroad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​ शिल्पा शेट्टीपासून ते शाहरुख-करीनापर्यंत, परदेशात आहे या बॉलिवूड सेलेब्सची कोट्यवधींची प्रॉपर्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार्सची कमाई कोट्यवधींमध्ये आहे. त्यामुळे विविध माध्यमांमध्ये हे सेलिब्रिटी गुंतवणूक करत असतात. भारतासोबतच परदेशात हे सेलिब्रिटी प्रॉपर्टीत गुंतवणूक करणे पसंत करतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा हेसुद्धा प्रॉपर्टीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करताना दिसतात. आज त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस असून त्यांनी पत्नी शिल्पाला दिलेले मोठे गिफ्ट हे लंडनमधील घर आहे. 2009 साली राज आणि शिल्पा लग्नाच्या बेडीत अडकले. 


ब्रिटन, लंडनमध्ये आहे राज-शिल्पाची प्रॉपर्टी... 
- ब्रिटनमध्ये राज आणि शिल्पा यांचा आलिशान बंगला असून त्याचे नाव शिल्पाने 'राज-महल' असे ठेवले आहे. लग्नापूर्वीच शिल्पाने ब्रिटनमधील घराचे इंटेरिअर स्वतःच्या देखरेखीत पूर्ण केले होते. तिच्या सर्व घरांपैकी ब्रिटनमधील 'राज-महल' हे शिल्पाचे आवडते घर आहे. या घरात दोन मोठे हॉल, दोन रिसेप्शन हॉल, सात लग्झरी बेडरुम, स्वीमिंग पूल, मोठे कार गॅरेज, तीन बाल्कनी आणि एक मोठे गार्डन आहे. विशेष गोष्ट म्हणजे पहिली पत्नी कवीतासोबत घटस्फोट झाल्यानंतर राज यांनी हे घर विकले होते. मात्र शिल्पाच्या आग्रहाखातर पुन्हा खरेदी केले होते. राज यांनी 32 कोटींमध्ये हा बंगला खरेदी केला होता. आज त्याची किंमत 107 कोटींहून अधिक आहे.
- याशिवाय शिल्पा आणि राज यांचा लंडनमध्येसुद्धा एक फ्लॅट असून 2009 मध्ये त्यांनी 7 कोटींना खरेदी केला होता. शिल्पाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा फ्लॅट त्यांनी तिला गिफ्ट केला होता.  


पुढील स्लाईड्सवर वाचा, बॉलिवूडच्या आणखी कोणकोणत्या स्टार्सकडे आहे परदेशात बंगले...

बातम्या आणखी आहेत...