आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shipla Shetty And His Husband Raj Kundra Celebrates Their 7th Wedding Anniversary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7th Wedding Ann: शाही थाटात लग्नगाठीत अडकले होते शिल्पा-राज, 50 लाखांचा होता वेडिंग ड्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमन राज कुंद्रा आज त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा करत आहेत. 22 नोव्हेंबर 2009 रोजी शिल्पा आणि राज लग्नगाठीत अडकले होते. शिल्पाचे लग्न 2009 मध्ये बॉलिवूडमधील मोठा इव्हेंट ठरला होता. मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा येथील बावा व्हिलामध्ये शिल्पा-राजचा शाही लग्नसोहळा रंगला होता. मेंदीपासून ते संगीत, लग्न आणि रिसेप्शनपर्यंत या सेलिब्रिटी कपलच्या रॉयलनेसची झलक बघायला मिळाली होती. शिल्पा शेट्टीने वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने पती राज कुंद्राला सोशल मीडियावर एक प्रेमळ मेसेज पाठवला आहे. शिल्पाने तिच्या मेसेजमध्ये लिहिले - “Whoa! 7 yrs..Happy Anniversary @therajkundra “I have found my Home in your Heart and Love in your Soul.” I’m the luckiest girl in the world. #hubbylove #soulmate. अनेक गोष्टींमुळे शिल्पा आणि राजच्या लग्न आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.
या गोष्टी होत्या आकर्णाचा केंद्रबिंदू...
- लग्नात शिल्पाने परिधान केलेल्या लहेंग्याची किंमत तब्बल 50 लाख रुपये होती. या लहेंग्यावर आठ हजार महागडे क्रिस्टल लावण्यात आले होते.
- लग्नात शिल्पाने कुंदन ज्वेलरी घातली होती. लहेंग्यासोबतच तिची ही ज्वेलरीसुद्धा खूप आकर्षक होती. अनमोल ज्वेलर्सच्या या ज्वेलरीवर डायमंड आणि एमरॉल्डसह अनेक महागडे स्टोन लावण्यात आले होते.
- शिल्पाच्या साखरपुड्याच्या अंगठीची किंमत तब्बल तीन कोटी रुपये होती.
- शिल्पासाठी डिझायनर तरुण ताहिलानी यांनी वेडिंग ड्रेसेस डिझाइन केले होते. तर शांतनू-निखिल यांनी राज कुंद्रासाठी वेडिंग ड्रेसेस डिझाइन केले होते.
- लग्नानंतर मुंबईतील ग्रॅण्ड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिल्पा-राजचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते.
- रिसेप्शनवेळी शिल्पा आणि राजने तब्बल 80 किलोंचा केक कापला होता.
- शिल्पाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज आणि प्रसिध्द स्टार्स उपस्थित होते. पार्टीमध्ये मोनिका बेदी, मान्यता दत्त, संजय दत्तसुध्दा सामील होते. माधनव आपल्या पत्नीसह पार्टीत पोहोचला होता. जुही चावला पतीसह दिसली होती. या सर्व स्टार्ससह बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसुध्दा पार्टीत पोहोचला होता.

आज शिल्पा-राजच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नाची निवडक छायाचित्रे या पॅकेजमध्ये दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा शिल्पा-राजच्या शाही लग्नसोहळ्याची एक छोटीशी झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...