मुंबई - 15 ऑगस्टच्या दिवशी रमेश सिप्पी यांच्या चित्रपटाला 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात मैत्री, दुश्मनी, रोमान्स, अॅक्शन असा सर्व मसाला टाकला होता. या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली पण अवॉर्डच्या बाबतीत हा चित्रपट मागे पडला. चित्रपटाला 9 कॅटेगरीमध्ये 23 नॉमिनेट करण्यात आले पण अवॉर्ड मिळाले केवळ एक. बेस्ट एडीटींगसाठी एमएस शिंदे यांना हा पुरस्कार मिळाला. खूप कमी जणांना माहीत आहे की, आयुष्याच्या शेवटचा काळ त्यांच्यासाठी फार खराब होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 28 सप्टेंबर 2012 साली त्यांचा मृत्यू झाला. शिंदे यांना नाही मिळाली आर्थिक मदत...
- आपल्या फिल्मी करीअरमध्ये शिंदे यांनी 100 चित्रपटाचे एडीटींग करणाऱ्या एमएस शिंदे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.
- जवळपास 35 वर्षे चित्रपटसृष्टीला दिल्यानंतरही शिंदे यांनी शेवटचे काही दिवस आर्थिक तंगीत घालवले.
- 2011 साली एका लीडींग वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आर्थिक तंगीविषयी सांगितले होते.
- शिंदे त्यांच्या 160 स्क्वेअर फुट घरात लहान मुलगी अचलासोबत राहत होते. पण 6 महिन्यानंतर ते सेंट्रल मुंबईला शिफ्ट झाले.
- काही कारणाने त्यांची बिल्डींग पाडण्यात आली होती आणि त्यांना एका कॅम्पमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.
- मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांनी फिल्म एडिटर असोसिएशनलाही आर्थिक तंगीमुळे पत्र लिहीले होते.
- तेव्हा त्यांना फिल्म एडिटर असोसिएशनकडून 5000 रुपयांची मदत मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कधीच सिनेसृष्टीकडून आर्थिक मदतीची अपेक्षा केली नाही.
बॉलिवूड स्टार्सकडे नाही मागितली मदत..
- शिंदे यांनी सांगितले की, प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रेटी पैसा कमविण्यासाठी काम करतात. तेव्हा त्यांच्याकडून ते आपल्याला आर्थिक मदत करतील अशी अपेक्षा का ठेवावी?
- त्यांनी सांगितले की, मग अमिताभ बच्चन असो अथवा कोणीही सेलिब्रेटी ते कोणालाही मदत का करतील?
कितीतरी निर्मात्यांनी दिले नाही शिंदे यांचे पैसे..
- शिंदे यांची मुलगी अचला यांनी एका मुलाखतीत सांगितले की, वडिलांना कोणीही कधीच आर्थिक मदत केली नाही.
- अचलाने सांगितल्यानुसार," अनेक प्रोड्युसर्सनी कामाचे पैसेच दिले नाहीत. ना वडील कधी त्यांना पैसे मागायला गेले.
- फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट कर्मचारी यांच्याकडून वडिलांना मदत मिळाली. मोतीबिंदूचे ऑपरेशन आणि इतर मेडीकल गोष्टींचा खर्च मनसेने केला.
- वडीलांना अमेय कोपकर आणि शालिनी ठाकरे यांनी 51,000 रुपये दिले होते आणि त्यांची पूर्ण जबाबदारी घेतली. बॅरीस्टर एआर अंतुले यांनी वडिलांना दरमहा 500 रुपये देण्याचे कबूल केले.
पुढच्या स्लाईडवर वाचा, एमएस शिंदे यांच्या लहान मुलीने का केले नाही लग्न...