आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूटर चालवताना दिसला सलमान, 45 डिग्री तापमानात घातले होते स्वेटर, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
45 डिग्री तापमानात सलमानने चक्क स्वेटर घालून शूटिंग केले. - Divya Marathi
45 डिग्री तापमानात सलमानने चक्क स्वेटर घालून शूटिंग केले.
मुजफ्फरनगर/मेरठः 'सुल्तान' या सिनेमाचे शूटिंग सध्या मेरठच्या शुक्रताल या ठिकाणी सुरु आहे. यासाठी येथे एक मोठा सेट उभारण्यात आला असून अभिनेता सलमान खान गुरुवारी दुपारी शूटिंग सेटवर पोहोचला. 45 डिग्री तापमानात सलमान स्वेटर घालून स्कुटर चालवताना दिसला.

पुलावर मारल्या स्कूटरने फे-या
- सलमान शूटिंगवेळी स्कूटरवरुन शुक्रताल सेतूवर फे-या मारताना दिसला.
- हा सीन सहावेळा रिटेक झाल्यानंतर सातव्या वेळी ओके झाला.
- यापूर्वी सलमान खानचा डुप्लिकेट हा सीन इतर कलाकारांसोबत रिटेक करताना दिसला.
- शूटिंगवेळी पुलावर साधू दिसले.
सलमानने घेतला संतांचा आशीर्वाद
- यावेळी सलमान नीळ्या रंगाच्या स्कूटरवर फिरताना दिसला.
- सलमान पुलावर बसलेल्या संतांजवळ पोहोचताच सर्व संत हर हर महादेव बोलताना दिसले.
- सलमान या संतांचा आशीर्वाद घेतो, असा हा सीन चित्रीत करण्यात आला.
सकाळपासून टीम करत होती सलमानची प्रतिक्षा..
- शुक्रतालमध्ये गंगेच्या काठावर तयार करण्यात आलेल्या सेटची तयारी सकाळी पूर्ण झाली होती.
- सहायक कलाकार सकाळपासूनच तयार होऊन सेटवर हजर होते.
- येथे तयार करण्यात आलेल्या गुलशन ढाब्यावर ज्युनिअर आर्टिस्ट हरियाणातील ग्रामीण लोकांच्या वेशभूषेत दिसले.
- सलमान दुपारी शूटिंग सेटवर पोहोचला.
उकाड्यात झाले शूटिंग
- गुरुवारी सकाळपासूनच येथे गरम वारे वाहात होते.
- हवा खूप जोरात असल्याने गंगेच्या काठावर उभे राहणे कठीण झाले होते.
- सलमानच्या चाहते मात्र गर्मीची तमा न बाळगता शूटिंग स्थळी पोहोचले होते.
- मात्र चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे चाहत्यांना शूटिंग बघता आली नाही.
गंगेच्या काठावर उभारण्यात आला आखाडा
- शुक्रतालवर तयार करण्यात आलेल्या आखाड्यात सलमान खान कुस्ती खेळताना दिसणारेय.
- 'सुल्तान'मध्ये सलमानने पहिलवानाची भूमिका साकारली आहे.
ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारेय सिनेमा...
'सुल्तान' हा सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारेय. अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमाचे आदित्य चोप्रा निर्माते आहेत. यशराज बॅनरच्या या सिनेमात सलमान खानसह अनुष्का शर्मा आणि रणदीप हुड्डा मेन लीडमध्ये आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'सुल्तान'च्या सेटवर क्लिक झालेली छायाचित्रे...