आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होय मी लिव इनमध्ये आहे, पण... फरहान अख्तरसोबतच्या नात्याविषयी श्रद्धाने पहिल्यांदा तौडले मौन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही गेल्या काही दिवसांपासून अभिनेता फरहान अख्तरसोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. इतकेच नव्हे शक्ती कपूर यांनी फरहानच्या घरी जाऊन श्रद्धाला फरफटत आणल्याचे वृत्त आल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले. या चर्चांनंतर आता श्रद्धाने तिचे मौन सोडले आहे. यासंबंधीचे वृत्त लाइव्ह हिंदुस्थान संकेतस्थळाने दिले आहे.
 
जाणून घ्या फरहानसोबतच्या लिव इनविषयी काय म्हणाली श्रद्धा...
श्रद्धा कपूरला याविषयी विचारले असता, ती म्हणाली "माझ्याबद्दल अशाप्रकारच्या बातम्या येत असल्याचा मेसेज मला कोणीतरी केला. त्यावर मला हसूच आले कारण मला माहितीये की हे सगळं खोटं आहे. त्यामुळे मला अशा बातम्यांनी फरक पडत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. पण, जेव्हा माझे वडील, मावशी आणि माझ्या सहकलाकारांना अशा चर्चांमध्ये खेचले जाते तेव्हा ते मला योग्य वाटत नाही." 
 
''होय, मी लिव्ह इनमध्ये राहत आहे. पण माझ्या कुटुंबासमवेत मी राहतेय. माझ्या होणा-या नव-याच्या घरी जाण्याऐवजी मी त्यालाच आमच्या घरी घेऊन येईन, असे माझे घरातले मला चिडवतात. कारण, मला माझ्या कुटुंबासोबत राहणं आवडतं. माझ्या कुटुंबाला सोडण्याची मला इच्छा नाही. त्यामुळे अशा वृत्तांना उगाच खतपाणी घालू नये." 
 

'ओके जानू'सोबत श्रद्धाचे दोन सिनेमे रिलीजच्या मार्गावर...
 श्रद्धा कपूरचा 'ओके जानू' हा सिनेमा या महिन्यात म्हणजे 13 जानेवारी रोजी रिलीज होतोय. या सिनेमात आदित्य रॉय कपूर तिच्यासोबत लीड रोलमध्ये आहे. याशिवाय 2017 मध्ये श्रद्धाचे 'हाफ गर्लफ्रेंड' आणि 'हसीना' हे आणखी दोन सिनेमे रिलीज होणार आहेत.  
 
पुढे वाचा, अद्याप झालेला नाही फरहानचा घटस्फोट आणि यांसह बरेच काही...
बातम्या आणखी आहेत...