आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 वर्षांची झाली शक्ती कपूर यांची कन्या, जाणून घ्या तिच्याविषयी रंजक गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रद्धा कपूर वडील शक्ती, शिवांगी आणि भाऊ सिद्धांत कपूरसोबत - Divya Marathi
श्रद्धा कपूर वडील शक्ती, शिवांगी आणि भाऊ सिद्धांत कपूरसोबत
श्रद्धा कपूर वडील शक्ती, शिवांगी आणि भाऊ सिद्धांत कपूरसोबत
मुंबई- शक्ती कपूरची मुलगी श्रध्दा कपूर 27 वर्षांची झाली आहे. 3 मार्च 1989ला मुंबईमध्ये जन्मलेल्या श्रध्दाच्या प्रोफेशनली लाइफविषयी सर्वांना ठाऊक आहे. मात्र तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी divyamarathi.comने तिची मावशी पद्मिनी कोल्हापूरेशी बातचीत केली. जाणून घ्या पद्मिनी कोल्हापूरेने काय सांगितले...?
- श्रध्दाला कसा बर्थडे सेलिब्रेट करायला आवडते?
फॅमिलीसोबत लंच किंवा डिनर करायला आवडते.
- केकचा कोणताच फ्लेव्हर आवडतो?
चॉकलेट फ्लेव्हर.
- दरवर्षी श्रध्दामध्ये झालेला बदल?
बालपणी ती रागीट होती. तिला कुणी स्पर्श केलेला आवडत नव्हते. काळानुसार तिच्या विचारात बदल झाला. आज ती फॅमिली फ्रेंड्स आणि चाहत्यां प्रती केअरिंग झाली आहे.
- श्रध्दाचे फॅमिलीमधील टोपण नाव?
तिच्या रागीट स्वभावामुळे आम्ही तिला चिडकी लॉलीपॉप म्हणतो. त्याला अर्थ होतो रागीट लॉलीपॉप.
- कुटुंबासोबत तिचे एकुएशन कसे आहे?
खूप चांगले एकुएशन आहे. आमचा एक WhatsApp ग्रुप आहे. त्याचे नाव फिल्मी फॅमिली आहे. त्यामध्ये अनेक मेंबर्स आहेत. ती तिथे अॅक्टिव्ह असते आणि लगेच रिप्लाय देते. जर ती बिझी असली तर 30 ते 45 मिनिटांत रिव्हर्ट करते. ती शूटचे व्हिडिओसुध्दा शेअर करते.
- शाळेत कशी विद्यार्थीनी होती?
ती एक आज्ञाधारी विद्यार्थीनी होती. गणित आणि विज्ञानाऐवजी तिला भाषेवर विशेष प्रेम होते. ती फ्रेंच शिकत होती आणि नेहमी भाषा सुधारण्याचा प्रयत्न करायची. मलासुध्दा थोडी फ्रेंच भाषा येते आणि कधी-कधी ती माझ्यासोबत फ्रेंचमध्ये बोलते.
- तिला नेहमी अभिनेत्री होण्याची इच्छा होती?
अभिनयाविषयी मी खात्रीशीर नाहीये. परंतु बालपणी तिला संगीत आवडायचे. सर्व कुटुंबीयांची इच्छा होती, की तिने गायिका व्हावे. बालपणापासूनच ती चांगले गाते. ती शालेय दिवसांत फंक्शनमध्ये गाणी म्हणायची. घरात ती आईसोबत गाते. ती पियानोसुध्दा शिकली आहे.
- श्रध्दाचा आवडता सिनेमा?
बंदिनी
- आवडता परफ्यूम?
चॅनल
- आवडते ट्रॅव्हल डेस्टिनेशन
पॅरिस
- बॉलिवूड बडी
वरुण धवन
- हॉबी
धार्मिक आणि फिलोसोफिकल पुस्तके वाचणे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रध्दाचे बालपणीपासून आतापर्यंतचे निवडक PHOTOS...