आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरचे जेवण सोडून महिन्याला 1.5 लाखांचा टिफिन घेते शक्ती कपूरची कन्या श्रद्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रद्धा कपूर आणि शक्ती कपूर. - Divya Marathi
श्रद्धा कपूर आणि शक्ती कपूर.
मुंबई - शक्ती कपूर यांची मुलगी अभिनेत्री श्रद्धा सध्या फिटनेसबाबत फारच चिंतेत आहे. तिला आणकी स्लिम व्हायचे आहे. रिपोर्ट्सनुसार श्रद्धाने वजन कमी करण्यासाठी प्रोसेस सुरू केली आहे. त्यासाठी तिने सेलिब्रिटी ट्रेनर हायर करण्याबरोबरच खास लो कॅलरी जेवण मिळावे यासाठी टिफिनही लावला आहे. या टिफिनसाठी महिन्याकाठी ती सुमारे 1.5 लाख रुपये खर्च करते.
टिफिनमध्ये काय आहे खास..
श्रद्धाचे वडिल शक्ती पंजाबी तर आई शिवांगी कोल्हापुरे मराठी आहे. पण श्रद्धा दोन्ही राज्यांच्या खास पदार्थांना अव्हॉईड करत आहे. तिने लावलेल्या टिफिनमध्ये सहा प्रकारचे पदार्थ आहेत. त्यात प्रोटीन्स, नट्स, बीन्स आणि सॅलेडचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. श्रद्दालाही हे नवे जेवणे चांगलेच आवडत असल्याचेही समोर येत आहे.

2013 मध्ये आशिकी 2 मधून बॉलीवूडमध्ये ओळख मिळवणाऱ्या श्रद्धाने 'हैदर', 'एक व्हीलेन' आणि 'ABCD 2' सारखे हीट चित्रपटातही ती झळकली होती. तिचा 'रॉकऑन 2' चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज झाला असून ती सध्या तिच्या आगामी 'ओके जानू', 'हाफ गर्लफ्रेंड' आणि 'हसिना'वर लक्ष केंद्रीत करत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रद्धा कपूरचे लेटेस्ट फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...