आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shraddha Or Alia Anyone May Play The Role Of Sakshi In M.S.Dhoni

धोनीच्या पत्नीसाठी आलिया-श्रद्धामध्ये रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकसाठी अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या बरीच मेहनत घेत आहे. चित्रपटात धोनीची भूमिका उत्तमरीत्या वठवण्यासाठी सुशांत गेल्या अनेक दिवसांपासून धोनीच्या अनेक व्हिडिओज पाहत आहे.
दरम्यान, आता धोनीची पत्नी साक्षीच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध घेतला जात आहे. या भूमिकेसाठी आलिया भट्टला निर्मात्यांची प्राथमिक पसंती मिळाली आहे. तरीदेखील दुसरा पर्याय म्हणून या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरचे देखील नाव चर्चेत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सुरुवातीला साक्षीच्या पात्राची भूमिका छोटी ठेवण्यात आली हाेती. मात्र आता धोनीच्या पत्नीच्या भूमिकेचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आला आहे.