Home »Gossip» Shreyas Talpade Shut Down KRK On Twitter For Dissing His Movie

श्रेयस तळपदेने दाखवला मराठी बाणा...KRKची केली बोलती बंद; म्हणाला, 'औकातीत राहा, अन्यथा...'

दिव्य मराठी वेब टीम | Sep 09, 2017, 19:37 PM IST

मुंबई- केआरके ऊर्फ कमाल राशिद खान हा 'वाचाळ'वाणीमुळे बॉलिवूडमध्ये कुप्रसिद्ध आहे. तो नेहमी उलटसूलट पद्धतीने सिनेमांचा रिव्ह्यू करत असतो. नुकताच आलेला सनी देओल आणि श्रेयस तळपतेचा सिनेमा 'पोस्टर बॉईज'वर केआरकेने ट्‍विटरच्या माध्यमातून टीका केली. मात्र, सिनेमाचे दिग्दर्शन मराठमोठा अभिनेता श्रेयस तळपडे याने केले असल्याचे तो विसरला. श्रेयसने त्याला ट्‍विटरच्याच माध्यमातून सडेतोड उत्तर देऊन त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
केआरकेला दिले सडेतोड उत्तर...
- केआरकेने केलेल्या 'ट्‍वीट'वर श्रेयस तळपदे याने सडेतोड उत्तर दिले. श्रेयस म्हणाला... 'औकात में रह चू***कभी हाथ लगा तो इतनी जोर से पटकूंगा कि टप्पा खा के छत से लगेगा'

दरम्यान, 'पोस्टर बॉईज'मध्ये सनी, बॉबी देओलसोबतच खुद्द श्रेयसनेही अभिनय केला आहे. विशेष म्हणजे तो या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. त्यामुळे हा सिनेमा त्याच्यासाठी खूप स्पेशल आहे.

केआरकेने 'पोस्टर बॉईज'वर काय केले होते ट्वीट...
- 'पोस्टर बॉईज' हा टॉप क्लासचे वाहियात सिनेमा आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त 1.80 कोटी रुपये कमावले. देओल्स आणि श्रेयसमधील 'झिरो स्टारडम' या सिनेमाने दाखवून दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... KRK ने सलमानच काय तर शाहरुखचीही उडवली होती खिल्ली....

Next Article

Recommended