आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का? आता सिल्व्हर स्क्रिनवर 'धडक' मारण्यासाठी झाली सज्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरील छायाचित्रातील या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का... काय म्हणता नाही.. चला तर मग आम्हीच तुम्हाला सांगतोय, ही चिमुकली आहे तरी कोण? ही आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांची थोरली कन्या जान्हवी कपूर. जान्हवी आता लवकरच रुपेरी पडद्यावर 'धडक' मारण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'सैराट' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकममधून जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर स्क्रिन शेअर करणार आहे. अर्थातच जान्हवी आणि ईशान आर्ची-परशाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. 


करण जोहरचे होम प्रॉडक्शन असलेल्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ‘धडक’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘धडक’च्या फर्स्ट लूकमध्ये जान्हवी आणि ईशान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ही प्रेमकथा 6 जुलै 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता जान्हवी, ईशानचा ‘धडक’ बॉक्स ऑफिसवर किती यशस्वी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जयपूरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होतेय. 


जान्हवीने इन्स्टाग्रामवर शेअर केले पोस्टर...
जान्हवीने चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करुन omg guys I'm in a movie!!! #धड़क #Dhadak असे लिहिले होते. जान्हवीने 'धडक' या चित्रपटाचे एकुण चार पोस्टर्स शेअर केले आहेत. 


20 वर्षांची आहे जान्हवी, सोशल मीडियावर असते अॅक्टिव...
6 मार्च 1997 रोजी जन्मलेल्या जान्हवीने याचवर्षी वयाची 20 वर्षे पूर्ण केली आहेत. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर जान्हवी स्वतःविषयीचे सर्व अपडेट वेळोवेळी टाकत असते. तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर अकाउंटवर तिच्या बालपणापासून ते आतापर्यंतची अनेक छायाचित्रे बघायला मिळतात. 


आज या पॅकेजमधून आपण पाहुयात, जान्हवीची इन्स्टाग्राम डायरी...  

बातम्या आणखी आहेत...