अभिनेता अजय देवगण स्टारर 'दृश्यम' हा सिनेमा या शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल होतोय. या सिनेमात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरनने अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री तनुश्री दत्ताची धाकटी बहीण इशिता दत्ता यामध्ये अजय आणि श्रियाच्या मुलीच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे श्रिया आणि इशिता यांच्या वयात फारसे अंतर नाही. श्रिया 32 वर्षांची तर इशिता 24 वर्षांची आहे.
आपल्यापेक्षा वयाने केवळ आठ वर्षे मोठ्या असलेल्या तरुणीच्या आईची भूमिका वठवण्याचे आव्हान श्रियाने दृश्यममध्ये पेलले आहे.
खरं तर अभिनेत्री सहसा एवढ्या मोठ्या मुलांच्या आईची भूमिका पडद्यावर साकारण्यास सहसा तयार होत नाहीत. मात्र श्रियाने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची गाडी रुळावर आणण्यासाठी कदाचित हे आव्हान स्वीकारले असावे.
चला तर मग जाणून घेऊयात श्रियाविषयीच्या खास गोष्टी..
आईवडिलांची लाडकी लेक श्रिया..
11 सप्टेंबर 1982 रोजी श्रियाचा जन्म झाला. श्रिया ही पुष्पेंद्र सरन आणि नीरजा सरन यांची मुलगी असून तिचा जन्म डेहराडूनमध्ये झाला. त्यानंतर तिचे बालपण हरिद्वार पासुन काही मैलांवर असणा-या राणीपूर येथे गेले. तिचे वडील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) मध्ये कामाला असून आई शाळेत रसायनशास्त्राची शिक्षिका आहे. तसेच तिला एक मोठा भाऊ ज्याचे नाव अभिरूप हा आहे. श्रियाचे शिक्षण हरिद्वार येथील दिल्ली पब्लिक स्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण लेडी श्रीराम कॉलेज, दिल्लीमधून झाले. ती बी.ए.पर्यंत शिकली आहे.
व्हिडिओ अल्बममध्ये मिळाली सर्वप्रथम काम करण्याची संधी..
दिल्लीत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना श्रियाला व्हिडिओ अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. नृत्यगुरुंकडूनच तिला तिच्या पहिल्या व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर काही जाहिरातींमध्ये ती झळकली. 2001 मध्ये उषा किरण मुवीजच्या इष्टम या सिनेमाद्वारे तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. मात्र हा सिनेमा फारसा चालला नाही. मात्र 2002 मध्ये नागार्जुनसोबतचा संतोषम हा सिनेमा जबरदस्त हिट ठरला आणि त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तेलुगू सिनेमांपासून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारी श्रिया तामिळ सिनेमातील आघाडीची अभिनेत्री आहे. "शिवाजी द बॉस" (तामिळ) हा तिचा एक गाजलेला यशस्वी सिनेमा आहे. मॉडेलिंगकडून अभिनयाकडे वळलेल्या श्रियाने हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि इंग्रजी सिनेमातही अभिनय केला आहे
हिंदीत स्थिरस्थावर होण्याचा करतेय प्रयत्न...
'आवारापन', 'शुक्रिया: टिल डेथ डू अस अपार्ट', 'मिशन इस्तानबुल' या हिंदी सिनेमांमध्ये श्रिया झळकली आहे. मात्र या सिनेमांमधील तिच्या भूमिका फारशा गाजल्या नाहीत. आता दृश्यममध्ये ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. दक्षिणेत हिट ठरल्यानंतर आता श्रिया बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा सिनेमा तिच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
पार्टीत करते बिनधास्त एन्जॉय...
श्रियाला पार्टी गर्ल म्हणून ओळखले जाते. पार्टीत ती जीव ओतले. दारुच्या नशेत टल्ली होऊनसुद्धा थिरकताना तिला पाहिले गेले आहे. शिवाय खासगी आयुष्यातसुद्धा श्रिया खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे.
चला तर मग पाहुयात, श्रियाचा भूरळ घालणारा स्टायलिश अंदाज...