आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shruti Haasan And Many More Bollywood Actresses Undergone Plastic Surgery

चक्क स्वतःला कुरुप समजायची श्रुती हसन, सौंदर्य खुलवण्यासाठी या अॅक्ट्रेसेसनी केलीये Surgery!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः श्रुती हसन - Divya Marathi
फाइल फोटोः श्रुती हसन
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन आज (28 जानेवारी) 30 वर्षांची झाली. 15 ते 16 वर्षांपूर्वी तिने 'हे राम' सिनेमात कॅमियो भूमिका केली होती. त्यानंतर अभिनेत्री म्हणून पदार्पण करण्यासाठी तिला 9 वर्षे प्रतिक्षा करावी लागली. मात्र श्रुतीने आता इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. उत्तम लूक्स तिच्याकडे असल्याने काही दिवसांतच ती ग्लॅमरस म्हणून ओळखली जाऊ लागली. डोळे तिची खासियतच म्हणावी लागेल. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल, श्रुती स्वतःला कुरुप समाजयची. अभिनेत्री होण्यासाठी आकर्षक वैशिष्ट्ये आपल्यात नाहीतच, अशी तिची पक्की समजूत होती.
म्हणूनच की काय असे म्हटले जाते, की साउथचे सुपरस्टार कमल हासन यांच्या या थोरल्या लेकीने सर्जरीच्या माध्यमातून इतर अभिनेत्रींप्रमाणे ग्लॅमरस लूक मिळवला आहे. 2011 मध्ये श्रुतीने नाकाची सर्जरीसुद्धा करुन घेतली आहे. मात्र श्रुतीने सांगितले होते, की तिला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता, म्हणून तिने USमध्ये सर्जरी करून घेतली. आता यात किती तथ्य हे तर तिचे तिलाच ठाऊक. मात्र वरील छायाचित्रांमध्ये आपण श्रुतीच्या लूकमध्ये झालेला बदल स्पष्ट बघू शकतो.
बॉलिवूडमध्ये सुंदर दिसण्यासाठी सर्जरीची मदत घेतलेल्या अनेक अभिनेत्री आहेत. विशेष म्हणजे आजवर यापैकी कोणत्याही अभिनेत्रीने सर्जरी करुन घेतल्याचे मान्य केलेले नाही. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या चेह-याचा कायापालट करुन घेतलेल्या बी टाऊनमधील अभिनेत्रींविषयी...