आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रृती हासन ब्रिटीश बॉयफ्रेंडसोबत पोहोचली फॅमिली वेडिंगमध्ये, वडिलांची करुन दिली ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रृती हासन सध्या तिचा ब्रिटीश बॉयफ्रेंड मायकल कोर्सेलसोबतच प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. अशी माहिती आहे की दोघे लवकरच लग्न करणार आहेत. श्रृतीने काही दिवसांपूर्वीच आई सारिकासोबत मायकलची ओळख करुन दिली होती. तर, आता मायकल आणि श्रृती एका फॅमिली वेडिंगमध्ये एकत्र दिसले. यावेळी या दोघांसोबत श्रृतीचे पापा कमल हासनही होते. 

 

रेड साडीत गॉर्जियस दिसत होती श्रृती... 
- कौटुंबिक विवाह सोहळ्यात श्रृती रेड कलरच्या साडीत स्पॉट झाली तर तिचा बॉयफ्रेंडही पारंपरिक साऊथ इंडियन स्टाइलमध्ये तिच्यासोबत होता. रेड साडीत श्रृती गॉर्जियस दिसत होती. मायकल व्हाइट शर्ट आणि व्हाइट लुंगीमध्ये होता. 

 

लंडनमध्ये झाली श्रृती-मायकलची भेट 
-  श्रृती-मायकलची भेट लंडनमध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. मायकल ब्रिटीश थिएटर आर्टिस्ट आहे. तो लंडनच्या डीप डायविंग मॅन या थिएटर ग्रूपचा सदस्य आहे. त्याने लंडनच्या ड्रामा सेंटर येथून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे. 
- श्रृती सध्या तिची बहीण अक्षरासोबत वडिल कमल हासन दिग्दर्शित फिल्मच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या फिल्मचे नाव शाबाश नायडू आहे. ही फिल्म तामिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सारिकाला करुन दिली होती श्रृतीने बॉयफ्रेंडची ओळख...

बातम्या आणखी आहेत...