आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता बसु प्रसादने मान्य केले अफेअर, म्हणाली - \'होय दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद प्रेमात पडली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ही गोष्ट स्वीकारली असून गेल्या दोन वर्षांपासून फिल्ममेकर रोहित मित्तलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे मान्य केले आहे. श्वेता म्हणाली, "आम्ही दोघे आमच्या रिलेशनशिपला एन्जॉय करतोय. मात्र अद्याप आम्ही लग्नाचा निर्णय घेतलेला नाही. मात्र आमचे नाते चांगले आहे. रोहितसोबत माझी पहिली भेट फँटम फिल्म्समध्ये झाली होती." फँटम फिल्म्समध्ये स्क्रिप्ट कन्सलटंट होती श्वेता..

सेक्स रॅकेट प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर श्वेताला लगेचच अनुराग कश्यपकडून काम करण्याची संधी मिळाली होती. स्क्रिप्ट रायटर म्हणून ती त्याच्या 'फॅन्टम फिल्म्स' या प्रॉडक्शन कंपनीमध्ये रुजू झाली. इथेच तिला तिचा आयुष्याचा जोडीदार मिळाला. अनुरागच्या ऑफिसमध्येच या दोघांची पहिली भेट झाली.

दोन वर्षांपूर्वी अडकली होती सेक्स स्कँडलमध्ये..
दोन वर्षांपूर्वी हैदराबाद येथे सेक्स रॅकेटप्रकरणी श्वेताला अटक झाली होती. दोन महिने रेस्क्यू होममध्ये घालवल्यानंतर ती घरी परतली. हैदराबाद सेशल कोर्टाने तिला या प्रकरणी क्लिन चीट दिली होती. 'कहानी घर घर की' ही मालिका आणि 'मकडी', 'इकबाल', 'वाह लाइफ हो तो ऐसी' या हिंदी सिनेमात ती झळकली होती. साउथ इंडस्ट्रीतही ती काम करते. लवकरच छोट्या पडद्यावर ती ऐतिहासिक मालिकेत झळकणारेय.

श्वेताने रोहितसोबतची काही छायाचित्रे आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा श्वेताची रोहितसोबतची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...