आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी असा दिसायचा सिध्दार्थ मल्होत्रा, वयाच्या 18व्या वर्षी सुरु केले होते मॉडेलिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा - Divya Marathi
फाइल फोटो : सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा
मुंबई- सिध्दार्थ मल्होत्रा 31 वर्षांचा झाला आहे. 16 जानेवारी 1985ला त्याचा जन्म नवी दिल्लीमध्ये झाला. 2012मध्ये त्याने करन जोहरच्या 'स्टुडेंट ऑप द ईअर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत 'हंसी तो फंसी', 'एक व्हिलेन' आणि 'ब्रदर्स' सिनेमांत त्याने काम केले. त्याच्या 'कपूर एंड संस' आणि 'बार बार देखो' या दोन सिनेमांचे शूटिंग सुरु आहे.
वयाच्या 18व्या वर्षी सुरु केली मॉडेलिंगला सुरुवात...
सिध्दार्थने वयाच्या 18व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मात्र चार वर्षांनंतर त्याने प्रोफेशन सोडले. कारण तो यात समाधानी नव्हता. 'स्टुडेंट ऑफ द ईअर'पूर्वी त्याने अनुभव सिन्हाच्या एका सिनेमाचे ऑडिशन दिले होते. परंतु तो सिनेमा अडकला. 2010मध्ये त्याने करन जोहरच्या 'माय नेम इज खान' सिनेमात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
वडील करत होते इंडियन मर्चेंट नेव्हीमध्ये काम आणि आई होती होममेकर...
सिध्दार्थ मल्होत्राचे वडील सुनील इंडियन मर्चेंट नेव्हीमध्ये काम करत होते. सिध्दार्थची आई रिमी होममेकर आहे. त्याने दिल्लीच्या डॉन बोस्को शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असून शहीद भगत सिंह कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतले.
पुढील स्लाड्सवर क्लिक करून पाहा सिध्दार्थच्या आयुष्यातील काही फोटो...