आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुन्नाभाई'मध्ये अनुष्का, 'ताल'मध्ये दिसला होता शाहिद, असा होता स्टार्सचा Struggle

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[(वर) 'मुन्नाभाई MBBS' च्या एका सीनमध्ये संजय दत्त आणि अनुष्का, (खाली) 'ताल' च्या एका सीनमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहिद कपूर]
एन्टरटेन्मेंट डेस्क - 'मुन्नाभाई' सीरीजचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संजय दत्त तुरुंगातून परतल्यानंतर 'मुन्नाभाई 3' च्या शूटिंगला सुरुवात होणारेय. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या सीरिजचे 'मुन्ना भाई MBBS' (2003) आणि 'लगे रहो मुन्ना भाई' (2006) हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते.
2003मध्ये रिलीज झालेल्या संजय दत्त आणि ग्रेसी सिंह स्टारर 'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये अनुष्का शर्मासुद्धा झळकली होती, हे जाणून नक्कीच तुम्ही अचंबित व्हाल. मात्र हे खरे आहे. सिनेमातील एका सीनमध्ये अनुष्का शर्माची छोटीशी झलक बघायला मिळाली होती. वरील छायाचित्रात संजय दत्तच्या शेजारी असलेल्या होर्डिंगमध्ये अनुष्का शर्मा दिसत आहे. 'रब ने बना दी जोड़ी', 'बँड बाजा बारात', 'पीके' आणि अलीकडेच रिलीज झालेल्या 'दिल धडकने दो' या सिनेमातील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणा-या अनुष्काचे हे स्ट्रगलिंगच्या काळातील छायाचित्र आहे.
अनुष्काप्रमाणेच शाहिद कपूरनेसुद्धा करिअरच्या स्ट्रगलिंगच्या काळात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. ऐश्वर्या राय स्टारर 'ताल'मध्ये तो डान्सरच्या भूमिकेत होते. तालच्या एका सीनमध्ये शाहिद ऐश्वर्याची ओढणी सांभाळताना दिसतोय.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशाच काही स्टार्सविषयी ज्यांनी स्ट्रगलिंगच्या काळात छोट्या भूमिका साकारल्या होत्या...