मुंबईः 'हेट स्टोरी' सीरिजचा तिसरा सिनेमा येत्या 4 डिसेंबर रोजी रिलीज होणारेय. या सिनेमात डेजी शाह, जरीन खान, शर्मन जोशी आणि करण सिंग ग्रोवर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'हेट स्टोरी 3' हा डेजी शाहचा दुसरा बॉलिवूड सिनेमा आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'जय हो' या सिनेमाद्वारे केली होती.
अभिनेत्री होण्यापूर्वी डेजी एक बॅकग्राउंड डान्सर होती. 2003 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर 'तेरे नाम' या सिनेमात बॅकग्राउंड डान्सरच्या रुपात दिसली होती. तिने आपल्या करिअरची सुरुवात कोरिओग्राफर गणेश आचार्यच्या सहायकाच्या रुपात केली होती. 2005 साली 'मैंने प्यार क्यों किया' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमानची नजर डेजीवर पडली. सलमानने डेजीला सर्वप्रथम बॉडीगार्ड या सिनेमात करीनाच्या मैत्रिणीचा रोल ऑफर केला होता. मात्र तिने ती भूमिका नाकारली. त्यानंतर ती जय होमध्ये सलमानच्या अपोझिट दिसली.
शाहिद कपूर, अनुष्का शर्मापासून दिग्दर्शिका जोया अख्तरपर्यंत बी टाऊनचे असे अनेक सेलेब्स, आहेत, ज्यांनी संघर्षाच्या काळात छोट्या भूमिका वठवल्या होत्या. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, स्टार्सचा स्ट्रगल...