आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sneha Ullal Reached Surat For Promotion Of Bejuban Ishq Movie

PHOTOS: या खास अंदाजात दिसली ऐश्वर्यासारखी हुबेहुब दिसणारी ही अॅक्ट्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उलाल)
सूरतः बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उलाल गुरुवारी संध्याकाळी सूरत येथील हीरानगरीत पोहोचली होती. येथे ती आपल्या आगामी 'बेजुबान इश्क' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. या सिनेमाचे दिग्दर्शक दादासाहेब फाळेक पुरस्कारप्राप्त जसवंत गनगानी हे आहेत. मुळचे गुजरातचे असलेले गनगानी यांनी या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. हा सिनेमा 3 जुलै रोजी रिलीज झाला आहे.
हा एक म्युझिकल रोमँटिक सिनेमा आहे. या सिनेमात स्नेहाने अमेरिकेत वास्तव्याला असेलल्या साध्याभोळ्या भारतीय तरुणीची भूमिका वठवली आहे. स्नेहासोबत अभिनेत्री मुग्धा गोडसे आणि निशांत सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सिनेमाची कहाणी दोन तरुणी आणि एका तरुणाच्या अवतीभोवती फिरते. अडीच तासांच्या या सिनेमात आठ गाणी असून त्यापैकी एक आयटम साँग आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सूरत येथे पोहोचलेल्या स्नेहाची खास झलक...