आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाड केल्याचा आरोप लावून आली होती चर्चेत, साध्वी बनून फिरतेय ही बोल्ड मॉडेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजगीरमध्ये एका कुंडाखाली स्नान करताना सोफिया - Divya Marathi
राजगीरमध्ये एका कुंडाखाली स्नान करताना सोफिया
पटणा: 'बिग बॉस सीजन-7'ची स्पर्धक आणि टॉपलेस मॉडेलपासून नन बनलेली अभिनेत्री सोफिया हयात सध्या उत्तर भारतातील मंदिराच्या दौ-यावर आहे. तिने बिहारच्या महाबोधी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. तिने राजगीरच्या प्रसिध्द ब्रम्हकुंडात स्नान केले त्यानंतर ती बनारसला गेली आणि तिथे घाटांत फिरली. तसेच बाबा विश्वनाथचे दर्शन केले. तिने इंस्टाग्रामवर तिच्या दौ-याचे काही फोटो शेअर केले आहेत. सोफियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ती म्हणतेय, की माकडांना बिस्किट खाऊ घालण्यासाठी गेले होते. हाताने माकडांना बिस्किट देण्यापूर्वीच त्यांनी बिस्किट हिसकावले आणि तिथून पळून गेले.
सोफियाने लावले होते अरमान कोहलीवर आरोप...
- बिग बॉसच्या सातव्या पर्वात सहभागी झालेल्या सोफियाने शोमधील तिचा प्रतिस्पर्धक अरमान कोहलीवर छेडछाडीचा आरोप लावला होता.
- त्यानंतर अरमानला बिग बॉसच्या घरातच अटक करण्यात आली होती. नंतर मात्र त्याची जामीनावर सुटका झाली होती.
- सोफियाने रोहित शर्माच्या दुहेरी शतकानंतर टि्वटरवर टॉपलेस फोटो शेअर करून रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या होत्या.
म्हणून बनली नन...
- सोफियाने म्हटले, "आयुष्याला घाबरल्यामुळे तिच्यात हा बदल घडून आला आहे."
- ''दोन वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली.''
- ''एकवेळ मी इतक्या वाईट परिस्थितीत अडकले होते की, स्वत:ला संपविण्याचा विचार माझ्या मनात आला आहे. तसा प्रयत्नही मी केला होता.''
- ''पण त्यानंतर मला एक अशी व्यक्ती भेटली की जिने माझे मत परिवर्तन केले. त्याने मला जाणीव करुन दिली की, आपले शरीर हे सूर्यापासून बनले आहे आणि सूर्य हाच ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे.''
- नन एकप्रकारे सन्यास घेतल्यासारखे आहे.
नन बनल्यानंतर सांगितल्या होत्या या गोष्टी...
- सोफिया म्हणाली होती, 'आपण एका कारणामुळे पृथ्वी मातेसाठी एक गिफ्ट आहोत. त्यामुळे आपण सुंदर दिसू शकत नाही.'
- सोफियाचा दावा आहे की, तिचा दुसरा जन्म माँ 'होली ट्रिनिटी'च्या रुपात झाला आहे.
- नन बनल्यानंतर सोफियाने अभिनय आणि मेकअप न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच ती असंही म्हणाली की, यापुढे मी कधीच लग्न करणार नाही. तसेच लैंगिक संबंध करणार नसून मुलांना जन्मही देणार नाही.
- 'राम, कृष्ण आणि गणेश माझ्याकडे यावे आणि म्हणावे, की पृथ्वी स्वर्ग आहे आणि येथे नरकासाठी कोणतेच स्थान नाही. म्हणून मला पृथ्वीला स्वर्ग बनवायचे आहे.'
कधीकाळी असे होते सोफियाचे आयुष्य...
- ब्रिटेनची रहिवासी सोफियाला जुलै 2012मध्ये व्होग इटालियाने कर्वी आयकॉनचे टायटल देण्यात आले होते.
- सप्टेंबर 2013मध्ये FHM मासिकाने तिला जगातील 81वी मोस्ट सेक्सिएस्ट वुमनचा करार दिला होता.
- बॉलिवूड पार्टी आणि रेड कार्पेट इव्हेंट्समध्ये सोफिया बोल्ड लूकसाठी ओळखली जात होती. सोशल मीडियावरसुध्दा तिने अनेक टॉपलेस आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोफिया हयातने धार्मिक स्थळांना भेट दिलेले फोटो...
बातम्या आणखी आहेत...