Home »Gossip» Soha Ali Khan Posts Picture Of Daughter Inaaya Naumi And Kunal Khemu

सोहाने शेअर केला मुलगी इनायाचा First Photo, कौतुकाने न्याहाळताना दिसला कुणाल

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 11:29 AM IST

मुंबई- अभिनेत्री सोहा अली खान हिला अलीकडेच कन्या रत्नाची प्राप्ती झाली आहे. अलीकडेच सोहाने आपल्या लाडक्या लेकीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत कुणाल खेमू मुलगी इनायाला कौतुकाने न्याहाळताना दिसतोय. आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर करुन सोहाने त्याला "Bliss" असे कॅप्शन दिले आहे. सोहाने 29 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला.
एप्रिल महिन्यात बेबी बंप फ्लॉन्ट करुन सोहाने दिली होती गोड बातमी..
- इनाया हे सोहा आणि कुणाल यांचे पहिले अपत्य आहे. याचवर्षी एप्रिल महिन्यात बेबी बंप फ्लॉन्ट करुन सोहाने आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.

लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर सोहा-कुणाल अडकले होते लग्नगाठीत...
- सोहा आणि कुणाल यांच्या लग्नाला गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात दोन वर्षे पूर्ण झाली.
- तीन वर्षे डेटिंग आणि काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर हे कपल 25 डिसेंबर 2015 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले.
- 'रंग दे बसंती', 'साहेब बीवी और गैंगस्टर रिटर्न्स', 'दिल मांगे मोर' या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री सोहा 2016 साली '31st अक्टूबर' या चित्रपटात शेवटची दिसली होती.

'गोलमाल अगेन'मध्ये झळकणार आहे कुणाल
- कुणाल खेमूने 2005 साली मोहित सूरींच्या 'कलयुग' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
- त्यानंतर तो 'ट्रॅफिक सिग्नल', 'ढोल', 'सुपरस्टार', 'ढूंढते रह जाओगे' आणि 'गो गोवा गॉन' या चित्रपटांमध्ये झळकला होता. लवकरच तो 'गोलमाल अगेन' मध्ये दिसणार आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची मुलगी इनाया नौमीसोबतचे निवडक PHOTOS...

Next Article

Recommended