आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Facts: ऋषी कपूर यांनी चक्क खरेदी केला होता अवॉर्ड, अशी असते अवॉर्ड शोची प्रोसेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अलीकडेच एका प्रसिद्ध वृत्तपत्राने बॉलिवूड अवॉर्ड्सविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या अवॉर्ड्सच्या विश्वासार्हतावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पैशांच्या मोबदल्यात अवॉर्ड...
काही दिवसांपूर्वी पत्रकार राजीव मसंद यांना दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारने एक खुलासा केला होता. त्याने सांगितले, "अनेकदा अवॉर्ड शोचे आयोजक अवॉर्डच्या मोबदल्यात मला माझ्या परफॉर्मन्सच्या मानधनात कपात करायला सांगतात. अर्थातच तुम्ही फिस कमी घ्या आम्ही तुम्हाला अवॉर्ड देतो, असे मला आयोजक म्हणतात. मात्र मी त्यांना म्हणतो, तुम्ही तुमचा अवॉर्ड तुमच्याकडेच ठेवा आणि मला माझ्या परफॉर्मन्सचे पूर्ण पैसे द्या."
ऋषी कपूर यांनी खरेदी केला होता अवॉर्ड
अभिनेते ऋषी कपूर यांनीसुद्धा असाच एक धक्कादायक खुलासा केला होता. 'बॉबी' या पहिल्या सिनेमाच्या रिलीजनंतर पैसे देऊन बेस्ट डेब्यू अॅक्टरचा अवॉर्ड मिळवल्याचे त्यांनी कबुल केले.
अवॉर्ड शोची प्रक्रिया
बॉलिवूडमध्ये फिल्मफेअर, स्टारगिल्ड अवॉर्ड्स, स्टारडस्ट अवॉर्ड्स, स्क्रिन अवॉर्ड्ससह अनेक नावाजलेले अवॉर्ड शो दरवर्षी होत असतात. या अवॉर्ड शोची प्रक्रिया काहीशी अशी असते. नॉमिनेशन फायनल झाल्यानंतर एखाद्या अवॉर्ड शोची टीम कलाकारांना इन्व्हिटेशन पाठवते. त्यानंतर संबंधित स्टारचे मॅनेजर शोच्या टीमला फोन करुन तो स्टार शूटिंगमध्ये बिझी आहे, किंवा शहराबाहेर आहे की नाही, हे सांगते. समजा एखाद्या कारणास्तव संबंधित कलाकार अवॉर्ड शोमध्ये हजर राहणार नसेल, तर शेवटच्या क्षणी अशा अभिनेत्याची वर्णी तेथे लागते, जो शोमध्ये सहभागी होऊ शकेल.
अनेकदा विना नॉमिनेशन दिले जातात अवॉर्ड
अनेकदा तर एखाद्या अभिनेत्याला नॉमिनेशनच मिळत नाही. अशा परिस्थितीत स्पेशल कॅटेगरी बनवली जाते. उदाहरणार्थ स्टार ऑफ द इयर, एन्टरटेनर ऑफ द इयर किंवा मोस्ट स्पेशल परफॉर्मन्स ऑफ द इयर या नव्या कॅटेगरीत कलाकारांना पुरस्कार दिले जातात.
पुढील स्लाईड्समध्ये वाता, अवॉर्ड सोहळ्याशी निगडीत आणखी काही खुलासे...