आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somy Ali Was A Salman Khan's Ex Girlfriend, She Is Celebrated 39th Birthday Today

B'day: ही पाकिस्तानी तरुणी आहे सलमानची Ex-गर्लफ्रेंड, ऐश्वर्यासाठी दिला होता हिला दगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री सोमी अली)
बॉलिवूड अभिनेत्री, डिझायनर, सामाजिक कार्यकर्ती आणि पत्रकार सोमी अली हिचा आज 39 वा वाढदिवस आहे. 25 मार्च 1976 रोजी पाकिस्तान येथील कराची येथे तिचा जन्म झाला. कराचीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोमी आपल्या कुटुंबीयांसोबत अमेरिकेत स्थायिक झाली. सोमीने फ्लोरिडा येथे सायकोलॉजीत ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर मियामी युनिव्हर्सिटीत पत्रकारितेचे शिक्षण घेतले. 90च्या दशकातील सोमी प्रसिद्ध अभिनेत्री होती.
करिअर ऐन बहारात असताना सोमीने बॉलिवूडला रामराम ठोकला. खरं तर सिनेमांपेक्षा सोमी सलमानबरोबरच्या अफेअरमुळे लाईमलाईटमध्ये होती. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने बॉलिवूडला रामराम ठोकला आणि त्यानंतर अज्ञातवासात निघून गेली.
आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्याविषयी बरेच काही...
सलमानचा सिनेमा बघून पडली होती त्याच्या प्रेमात...
सोमी मुळची कराचीची (पाकिस्तान) आहे. तिचे बालपण यूएसए फ्लोरिडामध्ये गेले. 15 वर्षांची असताना सोमीने सलमानचा एक सिनेमा बघितला होता. त्याचवेळी ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर तिने आपल्या कुटुंबीयांकडे फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी परवानगी मागितली. सोमीच्या हट्टामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला भारतात येण्याची परवानगी दिली. मुंबईत आल्यानंतर सिनेसृष्टीत पदार्पण करणे सोपे नव्हेत. येथे आल्यानंतर सोमीला हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. याचदरम्यान तिची भेट सलमानबरोबर झाली होती.
पुढे वाचा, सलमानसोबत झाला होता साखरपुडा...