आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Sinha And Arjun Kapoor Got Golden Kela Awards

सोनाक्षी सर्वात \'घटिया\' अभिनेत्री तर अर्जुन ठरला सर्वात खराब अभिनेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा)
मुंबई- अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एक विक्रम रचला आहे, परंतु ती हा विक्रम कदापि लक्षात ठएऊ इच्छित नाही. सोनाक्षीने तिस-यांना सर्वात 'घटिया अभिनेत्री'चा किताब आपल्या नावी केला आहे. हा किताब तिला गोल्डन केला अवॉर्डच्या वतीने देण्यात आला आहे. सोनाक्षीला यावर्षीच्या 'अॅक्शन जॅक्सन' सिनेमासाठी हा अवॉर्ड देण्यात आला आहे. गोल्डन केला अवॉर्ड अंतर्गत यावर्षी अर्जुन कपूरला 'गुंडे' सिनेमासाठी सर्वात 'घटिया अभिनेता' तर प्रभू देवाला सर्वात अॅक्शन जॅक्सनसाठी 'घटिया दिग्दर्शक' अवॉर्ड मिळाला आहे. सर्वात वाईट सिनेमाचा अवॉर्ड साजिद नाडियाडवाल्याला 'हमशकल्स'साठी मिळाला आहे. गोल्डन केला अवॉर्डचे हे सातवे वर्ष आहे. या अवॉर्डना क्रिएटीव्ह हेड अनंत सिंह यांची कल्पनाशक्ती मानले जाते.
गोल्डन केला अवॉर्डमध्ये कुणाला काय-काय मिळाले-
>सर्वात खराब अभिनेता : अर्जुन कपूर (गुंडे आणि इतर सिनेमांसाठी)
>सर्वात खराब अभिनेत्री: सोनाक्षी सिन्हा (अॅक्शन जॅक्सन, लिंगा आणि हॉलिडे)
>सर्वात खराब पदार्पण: टायगर श्रॉफ (हिरोपंती)
>सर्वात खराब दिग्दर्शक: प्रभु देवा (अॅक्शन जॅक्सन)
>सर्वात खराब सिनेमा: हमशकल्स
>सर्वात खराब गाना: ब्लू है पानी पानी (यो यो हनी सिंह यारिया सिनेमातील)
>सर्वात खराब लिरिक्स: आईसक्रीम (शब्बीर अहमद, सिनेमा- एक्सपोज)
>'बावरा हो गया है के' अवॉर्ड: अभिषेक शर्मा (शौकीन्स)
>सर्वात खराब रिमेकचा रामगोपाल वर्मा यांना आग अवॉर्ड: बँग-बँग
>व्हाय आर यू स्टिल ट्राइंग अवॉर्ड: सोनम कपूर
>बस किजिए, बहुत हो गया अवॉर्ड: यो यो हनी सिंह
>महिलांच्या खराब चित्रणासाठी शक्ती कपूर अवॉर्ड: अॅक्शन जॅक्सन
>सर्वात खराब उच्चाराचा दारा सिंह अवॉर्ड: प्रियांका चोप्रा
>एलियनप्रमाणे दिसण्याचा जादू अवॉर्ड: शाहरुख खान (हॅपी न्यू अवॉर्ड)
>सर्वात ज्यास्त वादग्रस्त सिनेमा: पीके
>सर्वात क्रिएटिव्ह नावाचा हॉरर सिनेमाचा खूनी ड्रॅक्युला अवॉर्ड: मूव्ही 6-5=2
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अवॉर्डमधील काही फोटो...