मुंबई - 24 वर्षीय प्रिया मुखर्जी ही तरुणी लवकरच फिल्मी दुनियेत
आपले नशीब आजमावताना दिसणार आहे. पहिल्याच प्रयत्नात तिला यशदेखील मिळाले आहे. तिला सिनेमाच्या ऑफर्स मिळू लागल्या असून ब-याच ऑडीशन्सही तिने दिल्या आहेत. प्रियाला अभिनयाच्या दुनियेत हा शॉर्टकट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हामुळे मिळाला आहे. याचे कारण म्हणजे प्रिया हुबेहुब सोनाक्षीसारखी दिसते.
लंडनची रहिवाशी असलेली प्रिया सोनाक्षीची चाहती आहे. तिने
फेसबुक,
ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल साइट्सवर स्वतःची आणि सोनाक्षीची छायाचित्रे अपलोड केली आहेत. मार्च महिन्यात सर्वप्रथम प्रिया लाइमलाइटमध्ये आली. हुबेहुब सोनाक्षीसारखी दिसत असल्याने प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली.
सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीतून ऑफर्स आल्याचे प्रिया सांगते. लवकरच अभिनयाला सुरुवात करण्याची तिची इच्छा आहे. प्रिया सांगते, ''सोनाक्षीसारखे दिसणारे माझे एक छायाचित्र सोशल साइट्सवर झपाट्याने व्हायरल झाले आणि लोक माझे फॅन बनले. यामुळे मला सिनेमाच्या ऑफर्स मिळू लागल्या आहेत.''
प्रियाची आई इटली तर वडील भारतीय वंशाचे...
प्रियाचे वडील भारतीय वंशाचे तर आई इटलीची रहिवाशी आहे. तिचा जन्म इटलीत झाला. मात्र यूरोपमधील एक छोटा देश असलेल्या लग्जमबर्ग येथे प्रिया लहानाची मोठी झाली. सध्या प्रिया लंडनमध्ये वास्तव्याल आहे. प्रिया सांगते, ''मला माझ्या जीवनात बदल घडवून आणायचा होता आणि माझे लूक्स सोनाक्षीसोबत साधर्म्य साधणारे असल्याचे लक्षात आल्यानंतर मला ही संधी मिळाली आहे. 2012 पासून लोक मला सोनाक्षीच्या नावाने बोलावतात. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात माझे आणि सोनाक्षीचे एकसारखे दिसणारे छायाचित्र व्हायरल झाले.''
सोनाक्षी सिन्हाने दिला ट्विटला रिप्लाय...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाप्रमाणेच प्रियानेदेखील चेह-यावर टॅटू बनवून ते छायाचित्र सोशल साइटवर पोस्ट केले होते. त्यावेळी काही जणांनी ट्विटरवर सोनाक्षीच्या लक्षात आणून दिले होते, की ही मुलगी हुबेहुब तुझ्यासारखीच दिसते. त्यावर सोनाक्षीने रिप्लाय दिला होता, ''अरे कॉपीकैट, पर हां इतना जरूर कहूंगी कि यह बहुत ही शानदार है।''
टीकाकारांना दिले उत्तर...
सोनाक्षीसारखी दिसत असल्याने एकीकडे प्रियाची फॅन फॉलोईंग वाढली, तर दुसरीकडे तिच्यावर काहींनी टीकासुद्धा केली. अनेकांनी ट्विट केले, की एका अभिनेत्रीच्या नावाचा वापर करुन ती स्वतःचे करिअर बनवू इच्छिते. यावर प्रियाने काही दिवसांपूर्वी युट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड करुन स्पष्टीकरण दिले होते. ती म्हणाली, ''सोनाक्षीसारखे दिसणारे माझे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर हजारो लोकांनी त्यावर कमेंट आणि लाइक केले. काहींच्या मते, मी हे नेम-फेमसाठी करतेय. मात्र तसे नाहीये. मी सोनाक्षीची मोठी चाहती आहे. आमचा चेहरा साधर्म्य साधणारा आहे, मात्र आम्ही वेगवेगळे व्यक्तिमत्त्व आहोत. अभिनयाच्या दुनियेत पदार्पण करण्यासाठी लोक काय काय करतात, हे मागे वळून पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल. मी सोनाक्षीसारखी दिसत असले तरी येथे मला स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करायचे आहे.''
पुढे पाहा, हुबेहुब सोनाक्षीसारखी दिसणा-या प्रियाचे निवडक फोटोज...