आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधूच्या रुपातील सोनमवरुन हटणार नाही तुमची नजर, वेडिंग मॅगझिनसाठी केले खास फोटोशूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सोनम कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटोज समोर आले आहेत. सोनमने एका प्रसिद्ध वेडिंग मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले असून यामध्ये तिचा ब्रायडल लूक लक्ष वेधून घेणारा आहे. फोटोशूटसाठी सोनमने डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेले आउटफिट्स परिधान केले आहेत. व्हाइट कलरच्या प्रिटेंड लहेंग्यावर तिने कुंदन ज्वेलरी घातली आहे. ती या मॅगझिनची कव्हर गर्ल बनली आहे. या फोटोशूटचे निवडक फोटोज सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करुन त्याला कॅप्शन दिले.  'The sweetest people I've worked with! 🙏🏽🙏🏽 Khush Wedding magazine'.

अलीकडेच सोनमला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार... 
सोनम कपूरला अलीकडेच 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'नीरजा' या सिनेमातील भूमिकेसाठी तिला   स्पेशल मेन्शन अवॉर्ड देण्यात आला. सोनमच्या आगामी सिनेमाविषयी सांगायचे म्हणजे, ती सध्या शंशाक घोष दिग्दर्शित 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. याशिवाय आर बाल्कींच्या 'पदम' या सिनेमातसुद्धा ती झळकणारेय. अक्षय कुमारसोबत ती या सिनेमाचे शूटिंग करत आहे.  

पुढील स्लाईड्सवर बघा, सोनमने वेडिंग मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटचे 6 फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...