आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूरने अभय देओलला केले ट्रोल, चुकी समजल्यानंतर डिलीट केले ट्वीट्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता अभय देओलने फेअरनेस क्रिमची जाहिरात करणाऱ्या सर्व कलाकारांना संबोधत सोशल मीडीयावर बरेच काही लिहीले होते. अभयने शाहरुख खान, विद्या बालन, सोनम कपूर, जॉन इब्राहम, सिद्धार्थ मल्होत्रा आणि दीपिका पादुकोन यांच्यावर निशाना साधत ते रंगभेदाला प्रमोट करत आहेत असे लिहीले होते.
 
यावर सोनम कपूरने पुढे येत त्याला उत्तर देण्याचे ठरविले पण तिच्यावरच सर्व ट्वीट डिलीट करण्याची वेळ आली. सोनमने ट्वीट करत अभयची चुलत बहिण ईशा देओलचा एक फोटो टाकला होता, ज्यात ती एका फेअरनेस क्रिमची जाहिरात करत होती. त्यावर तिने लिहीले "मी 
तुमच्या विचारांची स्तुती करते, पण यावर आपण काय म्हणाल?"
 
त्यावर अभय देओलने ट्वीट करत म्हटले, "हेसुद्धा तितकेच चुकीचे आहे. माझे विचार जाणून घेण्यासाठी माझी पोस्ट एकदा वाचा." 
 
अभयचा हा रिप्लाय पाहून सोनमला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि तिने तिचे सर्व ट्वीट डिलीट केले. 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...