आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास बसणार नाही... सोनमचे होते 87 किलो वजन, स्ट्रिक्ट डाएट-एक्सरसाइजने झाली FIT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतीच वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. सोनमचा जन्म 9 जून 1985 रोजी मुंबईतील चेंबूर येथे झाला. तसे पाहता फॅशनिस्टा सोनमची गणना आज बॉलिवूडमधील स्लिम अभिनेत्रींमध्ये होते. मात्र सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सोनम एवढी बारीक नव्हती. आपल्या वाढलेल्या वजनामुळे ती काळजीत पडली होती.

2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरिया' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या सोनमने आपले 32 किलो वजन कमी करावे लागले होते. सिंगापूरमध्ये अभिनयाचे धडे गिरवून भारतात परतलेल्या सोनमचे वजन तब्बल 87 किलो होते.

वजन कमी केल्यानंतर सोनममध्ये एवढा फरक पडला आहे, की पूर्वीची तिची छायाचित्रे पाहून ही सोनमच आहे, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. सोनम केवळ बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रीच नाहीये, तर उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी तिचे कौतुकसुद्धा होते.
एका मुलाखतीत सोनमने आपला डाएट प्लान चाहत्यांसोबत शेअर केला होता. सोनमने कसे कमी केले वजन जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर आणि सोबतच बघा तिची जिममध्ये वर्कआउट करतानाची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...