आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूसमयी गर्भवती होती ही 'सुर्यवंशम'ची अभिनेत्री, घरच्यांना शवही मिळाले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - 'सुर्यवंशम' चित्रपट प्रदर्शनानंतर भलेही फ्लॉप झाला असेल पण आज तो सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक आहे. एका वाहिनीवर दर दोन-तीन दिवसांनी हा चित्रपट आपण पाहू शकता. या चित्रपटात अमिताभसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या रघूने अभिनय केला आहे.पण दुर्दैवाने सौंदर्याने एका अपघातात या जगाचा निरोप घेतलेला आहे.
 
कमी वयात मृत झालेल्या अभिनेत्रींमध्ये सौंदर्याचे नाव येते. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा सौंदर्या गर्भवती होती. तिच्या कुटुंबियांना तिचा मृतदेहही पाहायला मिळाला नाही.
 
असा झाला होता अपघात 
 
- 17 एप्रिल 2004 रोजी सौंदर्या भारतीय जनता पार्टी आणि तेलुगू देसम पार्टीच्या निवडणूक प्रचारासाठी करिमनगर येथे जात होती. 

- सकाळी 11.05 वाजता फोर सीटर प्रायवेट एअरक्राफ्ट मध्ये बंगळुरूच्या जक्कुर एअरफिल्ड येथून उड्डाण केले आणि जेव्हा ते 100 फूट वरती गेले तेव्हा ते क्रॅश झाले. 

-  एअरक्राफ्टमध्ये सौंदर्याव्यतिरीक्त तिचा भाऊ अमरनाथ, हिंदू जागरण समितीचे सेक्रेटरी रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप होते. दूर्घटनेत या चौघांचा मृत्यू झाला. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, दूर्घटनेवेळी केवळ 31 वर्षाची होती सौंदर्या...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर 
क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...